ETV Bharat / state

कोरोना झाल्याने पत्नी विलगीकरणात; विरह सहन न झाल्याने पतीची घरी आत्महत्या

author img

By

Published : Jul 21, 2020, 3:11 PM IST

सोलापुरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.‌ सरकारने कोरोनाचे लवकर निदान होण्याकरता रॅपिड चाचण्या वाढविल्या आहेत. या चाचण्यांमध्ये सोमवारी कासेगाव(दक्षिण सोलापुर) येथे राहणाऱ्या वृद्ध महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

संग्रहित
संग्रहित

सोलापूर - कोरोना महामारी आत्महत्येची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलेला प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. या महिलेचा पती बब्रुवान गणपत काळे( वय 75) यांना पत्नीचा विरह सहन झाला नाही. त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

सोलापूरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.‌ सरकारने कोरोनाचे लवकर निदान होण्याकरता रॅपिड चाचण्या वाढविल्या आहेत. या चाचण्यांमध्ये सोमवारी कासेगाव(दक्षिण सोलापुर) येथे राहणाऱ्या वृद्ध महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचे पती बब्रुवान काळे हे अतिशय चिंतेत पडले. प्रशासनाने पॉझिटिव्ह आलेल्या या महिलेला क्वारंटाईन केले. त्या वृद्ध महिलेची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली.

पत्नी विलगीकरण केंद्रात गेल्याने एकटेच घरी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. काळे या वृद्ध दाम्पत्यास दोन मुले व एक मुलगी आहे. दोन्ही मुले आई- वडिलांपासून विभक्त शेतात राहतात. तर मुलगी ही विवाहित असून पुणे येथे राहते. वृद्ध वयात दोघांवर पुन्हा एकदा संसार करण्याची वेळ आली होती.

त्यांनी सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी खुंटीला गळफास घेत आपली जीवन यात्राच संपविली. कासेगावमध्ये गळफास घेतल्याची माहिती मिळताच पोलीस काॅन्स्टेबल हंचे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.