पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीतील प्रचार वाढला आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खांदे समर्थक आमदार संजय शिंदे व भाजप माढा खासदार रणजितसिंह निंबाळकर नाईक यांनी गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीमुळे खळबळ उडाली आहे. ही बैठक भाजप नेते कल्याण काळे उपस्थित होते, अशी ही चर्चा आहे.
खासदार निंबाळकर व आमदार शिंदे यांच्या गुप्त बैठक -
राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके प्रचारासाठी आमदार संजय शिंदे यांनी कंबर कसली आहे. खासदार निंबाळकर यांनी भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी ठाण मांडून आहेत. मात्र, खासदार निंबाळकर व आमदार संजय शिंदे यांच्या गुप्त बैठक झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गटात चिंतेचे वातावरण आहे. ही गुप्त बैठक कल्याण काळे यांच्या मध्यस्थीने झाल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्री बाळा भेगडे ही या बैठकीला उपस्थित होते, अशा सुद्धा चर्चा आहेत. भेगडे यांच्यावर प्रचाराची धुरा आहे. मात्र, खासदार निंबाळकर व आमदार शिंदे यांच्यात पडद्याआड कोणती चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.
पंढरपूर मतदारसंघात चर्चांना उधाण -
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचाराची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते तयारी केली आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची सुत्रे खासदार रणजीतसिंह निंबाळकर नाईक, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत. मात्र,अश्या प्रकारे गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत.