सोलापूर- 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनासाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात 8 जून 2021 रोजी मंगळवारी ऑफलाइन पद्धतीने नाव नोंदणी करून दुसऱ्या डोस दीला जाणार आहे. अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिली. ज्या नागरिकांना पहिला कोवॅक्सिन डोस दिला आहे. अशा लाभार्थ्यांसाठी दुसऱ्या लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात असलेल्या 15 नागरी आरोग्य केंद्रात हे दुसरे लसीकरण केले जाणार आहे.
पहिला डोस दिला जाणार नाही
कोणत्याही प्रकारची गर्दी वा गोंधळ न करता ज्या लसीकरण केंद्रावर पहिला डोस घेतला होता. त्याच केंद्रावर मंगळवारी 8 जून 2021 रोजी जाऊन दुसरा डोस घ्यावा. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी केली आहे. यावेळी कोणालाही पहिला डोस दिला जाणार नाही याचीही लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे ही सांगण्यात आले आहे.
मोबाईलवर आलेल्या कोड वरून दुसरा डोस
पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनी लसीकरणास जाताना, पहिल्या डोसच्या वेळी तयार झालेले लाभार्थी आयडी सोबत आणणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी पहिला डोस घेण्यासाठी नोंदवलेला मोबाईल क्रमांक व मोबाईल सह उपस्थिती राहावे. असे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी सांगितले आहे. कारण लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर चार अंकी रेफरन्स कोड येणार आहे. व तो कोड टाकल्यानंतर लाभार्थीस लसीचा दुसरा डोस देता येणार आहे. हे लसीकरण मनपाच्या सर्व पंधरा नागरी आरोग्य केंद्रामध्ये केले जाणार आहे. तसेच रेल्वे हॉस्पिटल, एस.आर.पी.एफ कॅम्प सोरेगाव, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय येथे लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा- ठाण्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार