करमाळा (सोलापूर) - तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असणारे कंदर हे गाव उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वसलेले आहे. येथील मनीषा भास्कर भांगे या महिला सरपंचांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून त्यांनी हे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. गावांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपण स्वतः गावातील नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असा सल्ला देत असून बाहेरील लोकांना गावांमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे, असेही सरपंच भांगे यांनी सांगितले. जर कोणी आजारी पडले तर त्या व्यक्तीला प्राथमिक केंद्रात त्याच्यावर इलाज करून पुढील तपासणीसाठी दुसऱ्या दवाखान्यात पाठवण्यात येणार आहे. शक्यतो नागरिकांनी स्वतःचे संरक्षण स्वतः करावे त्यातच आपले व आपल्या कुटुंबाचे पर्यायाने देशाचे भले आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉक्टर व पोलीस यंत्रणेवरील तान कमी करण्यासाठी आम्ही आमच्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असल्यचे भांगे यांनी सांगितले.
हेही वाचा -