पंढरपूर (सोलापूर)- राज्यांमधील सातत्याने महिलांवर अत्याचार चालू आहे. पंढरपूर सहा राज्यातील इतर भागांमध्येही महिलांवर अत्याचाराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. याबाबत भाजपाकडून विशेष अधिवेशनाची मागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही याबाबत सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यातूनच राज्यातील पीडितांच्या प्रकरणावर मीठ चोळण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
- चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल -
पंढरपूर शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील मुख्य आरोपीला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्या पीडित तिची भेट घेण्यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन सदर प्रकरणाबाबत चौकशी केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आमदार समाधान आवताडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिलांच्या अत्याचार प्रकरणावर ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
- शक्ती कायद्यावरून ठाकरे सरकारवर चित्रा वाघ बरसल्या -
गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे सरकार शक्ती कायद्यावर काहीच बोलत नाहीत, शक्ती कायदा अजूनही प्रलंबित आहे, शक्ती कायद्यासंदर्भात राज्य सरकार अधिवेशनातही योग्य भूमिका घेत नाही. महिलांच्या सुरक्षितेसाठी शक्ती कायद्याची गरज असल्याचे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले.
- 'फास्टट्रॅक कोर्टामध्ये 1लाख 60 हजार केसेस पडून'
राज्यातील महिलांच्या अत्याचार प्रकरणातील केसेस राज्य सरकार फास्टट्रॅक कोर्टामध्ये घेतात. महिलांच्या अत्याचारातील फास्टट्रॅक कोर्टामध्ये आत्तापर्यंत 1लाख 60 हजार केसेस पडून आहेत. फास्टट्रॅक कोर्ट ही संकल्पना राज्य सरकारने समोर आणली पाहिजे. यासंदर्भातील लेखाजोखा ठाकरे सरकारने जनतेसमोर मांडण्याचे आव्हान चित्रा वाघ यांनी केले.
हेही वाचा - धक्कादायक... वारंगणांच्या वस्तीत सापडले दोन गुप्त भुयार, अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी व्हायचा उपयोग