ETV Bharat / state

कमी दराने सोनं देण्याच्या बहाण्याने लुटले... दीड लाखांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड! - crime in solapur

कमी दराने सोने देण्याची थाप मारून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरास मंद्रुप पोलिसांनी अटक केली आहे. त्याकडून 1 लाख 45 हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल होताच गतीने तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी चोवीस तासांत अशोक उर्फ अशीकान्या छपरु काळे(वय 35 वर्षे) याला बेड्या ठोकल्या.

robber arrested in solapur
कमी दराने सोनं देण्याच्या बहाण्याने लुटले... दीड लाखांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड!
author img

By

Published : Oct 27, 2020, 4:09 AM IST

सोलापूर - कमी दराने सोने देण्याची थाप मारून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरास मंद्रुप पोलिसांनी अटक केली आहे. त्याकडून 1 लाख 45 हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल होताच गतीने तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी चोवीस तासांत अशोक उर्फ अशीकान्या छपरु काळे(वय 35 वर्षे) याला बेड्या ठोकल्या. त्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे. परभणीत देखील खुनाच्या गुन्ह्यात तो फरार होता.

कमी दराने सोनं देण्याच्या बहाण्याने लुटले... दीड लाखांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड!

सोहेल सलीम अहमद मुल्ला(वय 23 वर्ष रा विजापुर,कर्नाटक) याला अशोक काळे या भामट्याने संपर्क साधून स्वस्तात सोनं देतो, अशी थाप मारली. सोहेल मुल्ला त्याच्या तीन मित्रांसोबत (4 ऑक्टोबर) रोजी सोलापूरात आला.

सोहेल यास पिंट्या पवार व राहुल भोसले यांनी वारंवार फोन करून तेरा मैल चौक (सोलापूर विजापूर महामार्ग) परिसरात रात्री बोलावून घेतले होते. तेरा मैल चौक येथून औराद कडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना 1 किमी अज्ञातस्थळी नेण्यात आले. त्यानंतर लोखंडी धारदार हत्याराने वार करून खिशातील 10 हजार 300 रुपये रोख रक्कम, दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली; आणि पळ काढला. याबाबत सोहेल मुल्ला यांनी 24 तारखेला रात्री मंद्रुप पोलीस ठाण्यात 6 अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सहापैकी एका संशयित चोरट्यास अटक केले आहे. अशोक उर्फ आशिकान्या काळे असे त्याचे नाव आहे. त्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याची एकूण किंमत 1 लाख 45 हजार रुपये आहे.

ही कारवाई एपीआय नितीन थिटे,पीएसआय गणेश पिंगुवाले,हेड कॉन्स्टेबल विश्वास पवार, भरत चौधरी, पोलीस नाईक यशवंत कलमाडी, पोलीस शिपाई किरण चव्हाण, संजय कांबळे आदींनी केली.या गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय गणेश पिंगुवाले हे करत आहेत.

पकडण्यात आलेला संशयित आरोपी हा परभणी जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी आहे. सोलापुरातील विविध पोलीस ठाण्यात त्याविरोधात चोरी, दरोडा, घरफोडी, खुनी हल्ला, आदी गुन्हे दाखल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.