ETV Bharat / state

अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या जीपची दुचाकीला धडक; पत्नी ठार तर पती गंभीर जखमी - pandharpur accident latest news

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात अवैधरित्या वाळू माफियाकडून वाळू उपसा करण्यात येतो. वाळू उपसा केल्यानंतर बिना नंबर प्लेटचे जीप चंद्रभागा नदी पुलावरून भरधाव वेगाने नेले जातात. पंढपूरमधील नागरिक सकाळी फिरण्यासाठी सोलापूर व पंढरपूर ला जोडणाऱ्या या पुलावरून 65 एकर मैदानावर जातात. परिणामी पुलावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Road Accident in pandharpur
Road Accident in pandharpurRoad Accident in pandharpur
author img

By

Published : Dec 15, 2020, 9:44 AM IST

Updated : Dec 15, 2020, 11:09 AM IST

पंढरपूर- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या जीपने दुचाकीवरुन जााणाऱ्य़ा पती-पत्नीस जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात पत्नी जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला असून पती प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकाश यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकी साठ फुटापर्यंत फरपटत गेली होती. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे.

वाळू माफियांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर-

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात अवैधरित्या वाळू माफियाकडून वाळू उपसा करण्यात येते. वाळू उपसा केल्यानंतर बिना नंबर प्लेटचे जीप चंद्रभागा नदी पुलावरून भरधाव वेगाने नेले जातात. पंढपूरमधील नागरिक सकाळी फिरण्यासाठी सोलापूर व पंढरपूरला जोडणाऱ्या या पुलावरून 65 एकर मैदानावर जातात. त्यामुळे पहाटेच्या वेळी या पुलावर नागरिकांची गर्दी असते. परिणामी पुलावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातानंतर वाळू माफियांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष-

वेळोवेळी याबाबतचे निवदेन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा- ऐतिहासिक शक्ती विधेयक दोन्ही सभागृहात एकाच दिवशी होणार मंजूर!

हेही वाचा- पाकिस्तानमधून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात; 'ई टीव्ही भारत' सोबतीला

Last Updated : Dec 15, 2020, 11:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.