ETV Bharat / state

Argue of Relatives in Hospital : सोलापुरात गब्बर पॅटर्न! मृतदेहावर उपचार करण्यासाठी नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव - Sparsh Hospital in Solapur

मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी त्याला दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न मृतदेहाच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी केला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार शेवटी सदर बाजार पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला. गब्बर सिनेमातील एका घटनेप्रमाणे सोलापुरात एक घटना घडली आहे.

नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव
नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव
author img

By

Published : Jan 20, 2022, 9:56 AM IST

सोलापूर - गब्बर सिनेमातील एका घटनेप्रमाणे सोलापुरात एक घटना घडली आहे. मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी त्याला दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न मृतदेहाच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळींनी केला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार शेवटी सदर बाजार पोलीस ठाण्यात ( Sadar Bazar Police Station ) जाऊन पोहोचला. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे. त्यानंतर मृतदेह नियमानुसार सिव्हील हॉस्पिटलकडे पाठविण्यात आला.

मृतदेहावर उपचार करण्यासाठी नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव

नातेवाईकांचा अट्टाहास -

18 जानेवारी रोजी सायंकाळी पुजारी ( वय 55 अंदाजे ) या पुरुषाला सोलापुरातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये ( Sparsh Hospital in Solapur ) दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या उपचाराअगोदर रुग्ण दगावला. स्पर्श हॉस्पिटल प्रशासनाने रूग्णाला मृत घोषित करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंतिम संस्कार न करता लष्कर परिसरातील नवनीत हॉस्पिटल येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास आणले आणि उपचाराची मागणी केली. नवनीत हॉस्पिटल मधील उपस्थित असलेल्या डॉक्टरांना संशय आला. त्यांनी उपचारासाठी दाखल न करता बाहेर येऊन तपासणी केली. त्यावरून हा मृतदेह असल्याने कसे उपचार करावे, असे डॉक्टरांनी सांगितले. पण नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी उपचारासाठी आग्रह धरला होता. मृतदेहाचा श्वास सुरू असून हात हलवत असल्याचे नातेवाईक सांगत होते. यावरून नवनीत हॉस्पिटलच्या टीमसोबत मृतदेहाचे नातेवाईक व मित्रमंडळींनी गोधळ करण्यास ( Argue of Relatives in Hospital ) सुरुवात केली.

नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव
नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव

मृतदेहावर उपचार करणे पडले असते महागात -

नवनीत हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी प्रसंगावधान साधला आणि मृतदेहाला हॉस्पिटलमध्ये दाखल न करता बाहेर येऊन तपासणी केली. हृदयाचे ठोके तपासले, ऑस्क्सिमीटर लावून पल्स तपासले. त्यामध्ये त्यांना खात्री झाली की, हा मृतदेह आहे. त्यांनी त्यावर उपचार करण्यास मनाई केली. यावरून रुग्णांचे मित्रमंडळी यांनी एकच गोंधळ केला. अखेर नवनीत हॉस्पिटल प्रमुख डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. जर मृतदेहावर उपचार सुरू करून बिलाची आकारणी केली असती तर, गब्बर सिनेमा प्रमाणे सोलापुरात घटना घडली असती आणि हॉस्पिटलला याची मोठी किंमत मोजावी लागली असती.

नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव
नातेवाईकांचा रूग्णालयावर दबाव

मृत प्रमाणपत्राची मागणी -

मृतदेहाचे नातेवाईक व इतर मित्रमंडळी हे डॉ. नितीन तोष्णीवाल आणि त्यांच्या टिमला मृत झाल्याचे प्रमाणपत्र मागत होते. परंतु सबंधित डॉक्टर आणि त्यांच्या टिमने तसे प्रमाणपत्र देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हे प्रमाणपत्र फक्त सिव्हील हॉस्पिटलमध्ये मिळते आणि ते देखील पोस्टमार्टम झाल्यानंतर कॉज ऑफ डेथ (मृत्यू झाल्याचे कारण) मिळते, असे सांगितले. तरीही कोणीही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते. त्यांनी वाद सुरूच ठेवला. अखेर डॉ. नितीन तोष्णीवाल आणि त्यांच्या टीमने रूग्णवाहिका बोलावून मृतदेह सिव्हील हॉस्पिटलकडे रवाना केला.

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून देखील अरेरावीची भाषा -

मृतदेहावर उपचार करण्यासाठी मनाई केल्यावर त्यामध्ये एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने रुग्णालय प्रशासनाला अरेरावीची भाषा वापरली असल्याची माहिती खुद्द डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पोलिस प्रशासनाने निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.