सोलापूर - आदिनाथ आणि मकाई कारखान्यांची देणी आम्हीच देणार असल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे. मांजरगाव येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. रश्मी बागल या करमाळा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार आहेत.
हेही वाचा - उमेदवार संत असला पाहिजे म्हणून सुधाकरपंतांना उमेदवारी - देवेंद्र फडणवीस
यावेळी प्रचार सभेत बोलताना बागल म्हणाल्या की, आदिनाथ कारखान्याचे 19 कोटी रुपये असे आहेत, ज्यांनी घेतले परंतु त्यांनी वाहने वाहीली नाहीत. ती चूक आमची आहे. ही चूक आम्हीच सुधारणार आणि यासाठी रश्मी बागल आणि दिग्विजय बागल जबाबदार असतील, ही ग्वाही प्रत्येकाला देते आम्ही कारखाना चालवूनच दाखवणार. असे बागल यांनी सांगितले.
हेही वाचा - करमाळ्यात पक्ष बदलाची नव्हे तर, व्यक्ती बदलाची गरज - रश्मी बागल