ETV Bharat / state

कर्ज बुडविणारे टोळके माझ्या विरोधात - आमदार राऊत - rajendra raut solapur news

बार्शी शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या विकास कामासंदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शहरातील कामे आणि विकासापेक्षा होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांवर विरोधकांचे लक्ष आहे, अशी टिका यावेळी केली.

rajendra raut took press conference on review of work
कर्ज बुडविणारे टोळके माझ्या विरोधात - आमदार राऊत
author img

By

Published : Jun 17, 2021, 9:06 PM IST

सोलापूर - शहरात होत असलेल्या कामात खोडा घालणे आणि विकासापेक्षा होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांवर विरोधकांचे लक्ष आहे. त्यामुळे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबत आता भाऊसाहेब आंधळकर आणि राजेंद्र मिरगणे यांचा गट एकत्र येत आहे. मात्र, हा गट नसून कर्ज बुडवणारी टोळी असल्याचा घणाघात आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. बार्शी शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या विकास कामासंदर्भात गुरुवारी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

जनतेची फसवणूक करणारे आणि हतबल झालेले टोळके एकत्र - राऊत

आर्यन शुगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासायचे सोडून दिलीप सोपल यांनी स्वहित साधले. बांधकाम व्यवसायामध्ये आरएसएमने अनेकांची फसवणूक केली. नागरिकांना हक्काचे घर मिळाले नाही. भाऊसाहेब आंधळकर यांचीही हीच अवस्था आहे. जनतेची फसवणूक करणारे आणि पूर्णतः हतबल झालेले टोळके सध्या माझ्या विरोधात एकत्र आल्याची टीका आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विकास कामांबाबत शाब्दिक युद्ध बार्शीत सुरू आहे. त्याच अनुषंगाने राऊत यांनी पत्रकार परिषद घेत कामाचा आढावा घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत, रावसाहेब मनगिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधकांची आश्वासने हवेत विरली

बार्शी उपसा सिंचन प्रकल्प ते जवळगाव येथील मध्यम प्रकल्पाची उभारणी यासंदर्भात गेल्या अनेक वार्षपासून केवळ अश्वसने दिली जात आहे. सत्तेशिवाय मंत्रीपदी असलेल्या विरोधकांना ही कामे सहज शक्य होती. केवळ इच्छाशक्ती नसल्याने विकास रखडला होता. आश्वासने तर हवेत विरली असून आता विकास कामात खोडा घालण्याचे काम केले जात असल्याचेही राऊत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.