ETV Bharat / state

जवळगाव मध्यम प्रकल्पात बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी; 1250 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली - Jawalgaon water Project news

मध्यम प्रकल्पातील पाण्याची साठवण आणि कालव्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बार्शी तालुक्यातील जवळगाव येथे अनोखा प्रयोग राबविला जाणार आहे. प्रकल्पात येणाऱ्या पाणी आता बंदिस्त जलवाहिनीद्वारे येणार असून या प्रकल्पाला जलसंपदा विभागाने मंजुरीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.

जवळगाव मध्यम प्रकल्पात बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी; 1250 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

author img

By

Published : Jun 12, 2021, 10:13 PM IST

बार्शी : पावसाळ्यात तालुक्यातील प्रकल्प हे ओव्हरफ्लो होत असले तरी उन्हाळ्यात कोरडेठाक असतात. त्यामुळे योग्य पद्धतीने प्रकल्पात पाणी साठवणूक होणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने तालुक्यातील जवळगाव येथील मध्यम प्रकल्पात पाणी आता बंदिस्त जलवाहिनीद्वारे येणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शिवाय जलसंपदा विभागाने यासंबंधी अहवाल तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे महाहौसिंगचे माजी सहध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तालुक्यातील जवळगाव येथे 1. 22 टीएमसीचा मध्यम प्रकल्प 1975 साली उभारण्यात आला होता. यामध्ये 5.73 दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा तर 21.18 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. या कालव्याच्या माध्यमातून 3560 हेक्टरावरील जमिनीला पाणी मिळावे असे धोरण आखण्यात आले होते. मात्र, अधिकतर पाण्याचा अपव्यय हा जलवाहिनीद्वारे होत असतो. जागोजागी गळती आणि जमिनीला पडलेल्या भेगा यामुळे केवळ 500 हेक्टरवरील क्षेत्रालाच याच लाभ झालेला आहे. अनेक वेळा दुरुस्ती कामेही होऊन हीच अवस्था असल्याने राजेंद्र मिरगणे व माजी मंत्री यांनी कालव्यात येणारे पाणी हे बंदिस्त जलवाहिनद्वारे येण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. अखेर या संदर्भात आता अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

1250 हेक्टरवरील शेत जमिनीला याचा लाभ होणार

दोन वर्षात जलवाहिनेचे काम पूर्ण झाले तर पाण्याचा अपव्यय टळेल आणि 1250 हेक्टरवरील शेत जमिनीला याचा लाभ होणार आहे. वर्षाकाठच्या दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्च न करता बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी थेट कालव्यात आणले तर शेकडो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी 31 किमी लांब असलेल्या या कालव्याच्या एकूण 14 वितिरिका बंदिस्त जलवाहिनीतून करण्याची मागणी करण्यात आली होती. जवळगाव तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता जलसंपदा विभागाने अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. वेळप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुधाकर कापसे तसेच वैराग विभागातील शेतकरी उपस्थित होते.

अपव्यय टळणार अन साठवण क्षमताही वाढणार
जवळगाव मध्यम प्रकल्प हा वैराग भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मात्र, सध्या जागोजागी गळती असल्याने हा कालवा पूर्ण क्षमतेने भरत नाही. शिवाय पाण्याचा अपव्यय होत आहे. बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी कालव्यात आले तर या भागातील 1250 अतिरिक्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.