सोलापूर - मुंबई आणि पुण्यादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
बोर घाटातील हे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम चाचणीनंतर ही मार्गिका १५ जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन सुरु आहे. ही माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस झाला. यामुळे मंकी हिल ते नागनाथ या २ स्थानकांमधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वे मार्ग वाहून गेला. रेल्वे रुळांखालची खडी, रेती वाहून गेली. त्यामुळे ३ ऑक्टोबरपासून तिसरी मार्गिका पूर्णपणे बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले होते.
हेही वाचा - सरसकट कर्माफीचे काय झाले? सरकारला सवाल करत विरोधकांचा सभात्याग
२ टनेलच्या मध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला रेल्वे मार्ग उभा करणे आव्हानात्मक आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मार्गावर इतका मोठा ब्लॉक घेऊन कामे केली जात आहेत. यात मंकी हिल ते नागनाथ येथील वाहून गेलेल्या मार्गात खांब उभारण्यात आले आहेत. यावर रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत. कमी जागेत खोदकाम करून सुरक्षितरीत्या काम केले जात आहे. यासाठी रेल्वे कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. या मार्गावर रेल्वे इंजीन चालवून चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही मार्गिका लवकर खुली होणार आहे.