ETV Bharat / state

अखेर..! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांचा मुहूर्त मिळाला - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परीक्षा वेळापत्रक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला परीक्षांच्या तारखांचा मुहूर्त मिळाला आहे. 5 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. तर प्रात्यक्षिक परीक्षेबाबात 15 सप्टेंबरपर्यंत सर्व माहिती महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे द्यावी, अशा सूचना देण्यात आली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.

solapur news
सोलापूर विद्यापीठ
author img

By

Published : Sep 5, 2020, 4:48 PM IST

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला परीक्षांच्या तारखांचा मुहूर्त मिळाला आहे. 5 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. याबाबत येत्या दोन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रेणिक शहा यांनी सांगितले.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), राज्यपाल आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होतील, सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागून परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षेसंदर्भात 15 सप्टेंबरपर्यंत सर्व माहिती महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्याचेही शहा यांनी सांगितले.

घरी बसून ऑनलाइन परीक्षा

परीक्षेचे स्वरूप ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थी हे घरी राहूनच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपूर्वी भरून द्यायचा आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनची सुविधा उपलब्ध होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्येच ऑफलाइन परीक्षा देण्याची सुविधा राहणार आहे. पण, त्याचे कारण विद्यार्थ्यांना गुगल फॉर्ममध्ये द्यावे लागणार आहे. अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरावा लागणार आहे. संबंधित महाविद्यालये हा गुगल फॉर्म भरुन घेण्याची सोय विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहेत.

हेही वाचा - नोकरी लावतो, अशी थाप मारून फसवणूक करणाऱ्या बाप-लेकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.