सोलापूर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये चाळीसपेक्षा जास्त जवान हुतात्मा झाले आहेत. या जवानांच्या कुटुंबियासोबत संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे हे दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. संपूर्ण देशात जवानांच्या कुटुंबियासोबत असल्याचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.