ETV Bharat / state

पंतप्रधानांचे सोलापूरच्या सरपंचांना पत्र, जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्याचे केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेखी पत्राद्वारे देशातील सरपंचांना जलशक्ती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन केले आहे.

author img

By

Published : Jun 19, 2019, 7:11 AM IST

जलशक्ति अभियानाच्या लोगोचे अनावरण करताना सोलापूर जिल्हा परिषदेचे अधिकारी

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना लेखी स्वाक्षरीनिशी पत्र पाठवले आहे. जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन या पत्राद्वारे केले आहे. या सर्व पत्राच्या प्रती गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. या अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप देऊन या अभियान यशस्वी करावे, असा आग्रह मोदी यांनी या पत्राद्वारे केला आहे.

Prime Minister latter
पंतप्रधानांचे पत्र

मोदी यांनी लेखी पत्राद्वारे देशातील सरपंचांना जलशक्ती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सांडपाण्यासाठी शौषखड्डे घेणे, बांधबंदिस्त करणे, नदी आणि ओढ्यावर चेकडॅम तयार करणे, तटबंदी करणे तलावाचे खोलीकरण करून त्याची स्वच्छता करणे, सर्व परिसरामध्ये वृक्षारोपण करणे, पावसाच्या पाण्याचे टाकीमध्ये संकलन करणे आणि गावाच्या शिवारातील पाणी शिवारात अडवणे, असे विविध उपक्रम घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात २० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये जलशक्ती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच संदर्भाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये २२ जूनला विशेष ग्रामसभा घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी मंगळवारी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जलशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जलशक्ति अभियानाच्या लोगोचे अनावरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राऊत, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प चे संचालक अनिल कुमार नव्हाळे, कार्यकारी अभियंता माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सर्वांना जल प्रतिज्ञा घेऊन पाण्याचे संकलन आणि पाण्याचे महत्त्व सांगण्याची शपथ दिली गेली.

Intro:सोलापूर : संपूर्ण देशामध्ये जलशक्ती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना लेखी पत्राद्वारे केले आहे.यामध्ये सांडपाण्यासाठी शौषखड्डे घेणे, बांधबंदिस्ती करणे, नदी व ओढ्यावर चेकडॅम तयार करणे, तटबंदी करणे तलावाचे खोलीकरण व स्वच्छता करणे,सर्व परिसरामध्ये वृक्षारोपण करणे, पावसाच्या पाण्याचे टाकीमध्ये संकलन करणे, गावाच्या शिवारातील पाणी शिवारात अडवणे असे विविध उपक्रम घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Body:या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात दिनांक 20 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये जलशक्ती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.याच संदर्भाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये 22 जून रोजी विशेष ग्रामसभा घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज दिल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जलशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी जलशक्ति अभियानाच्या लोगोचे अनावरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अर्जुन गुंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विजय लोंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत चंचला पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राऊत, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प चे संचालक अनिल कुमार नव्हाळे,कार्यकारी अभियंता माने,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सर्वांना जल प्रतिज्ञा घेऊन पाण्याचे संकलन व पाण्याचे महत्त्व सांगण्याची शपथ दिली.
Conclusion:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सरपंचांना लेखी स्वाक्षरीनिशी पत्र दिले आहे. जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन या पत्राद्वारे केले आहे.या सर्व पत्राच्या प्रती गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेले आहेत.या अभियानाला जना आंदोलनाचे स्वरूप देऊन या अभियान यशस्वी करावे असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राद्वारे केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.