सोलापूर - देशद्रोही असणाऱ्या व्यक्तींसोबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांचा संबंध आहे. ( Pravin Dakekar Alleged on Nawab Malik ) या आरोपानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ईडीने अटक केली आहे. ( Pravin Darekar on Nawab Malik Arrest ) तर भाजपच्या आदेशानुसार त्यांना अटक केली नाही. मात्र, नवाब मलिक याना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते टीका प्रवीण दरेकर यांनी केली. ( Pravin Darekar Criticize MVA Gov on Nawab Malik ) ते सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Pravin Darekar Solapur PC )
नवाब मलिक हटाव देश बचाव भाजपचा नारा -
नवाब मलिक यांचे देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध आहेत, असा आरोप ईडी या तपास यंत्रणेने लावला आहे. एका देशद्रोही सोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध ठेवणे हा देशद्रोहच आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने 'नवाब मलिक हटाव देश बचाव' अशी भूमिका घेत राज्यभर नारा लावला आहे. राज्य सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेणे गरजेचे असताना महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळ वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहे. मात्र, भाजपा गप्प बसणार नाही. राजीनामा घेऊनच राहणार, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाचा केविलवाणा प्रयत्न -
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळ हे नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळातील नेते राजीनाम्याची मागणी करण्याऐवजी उलट नवाब मालिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत प्रवीण दरेकर यांनी टीका केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, महापौर कांचना यंनंम, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख जगदीश नालवार, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री हतबल झाले आहेत -
शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणावरून महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले होते. त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.यापूर्वी शिवसेनेची सत्ता असताना पुण्याचे शशिकांत सुतार, घोलप यांचे राजीनामे बाळासाहेब ठाकरे यांनी आरोप होताच घेतले होते. नैतिकतेच्या मुद्द्यावर अंतुले, बाबासाहेब भोसले, निलंगेकर यांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांवर मोठे आरोप झाले आहेत. ईडी या केंद्रीय तपास संस्थेने अटक करून कारवाई सुरू केली आहे. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेने सत्ता प्राप्त केली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अटक होते, ते कोठडीत जातात तरी देखील त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. यावरून असे दिसून येते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हतबल मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्यास सरकार पडेल अशी त्यांना भीती आहे, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बाणा दाखवला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.