ETV Bharat / state

कोरोनाची साखळी तोडण्यसाठी प्रशासनामधे समन्वय राखा - प्रांतधिकारी ढोले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील नवीन भक्त निवास येथे प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी संबंधितांना कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच्या सुचना केल्या.

meeting photo
meeting photo
author img

By

Published : Jul 18, 2020, 12:51 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक विलगीकरण करावे. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वार्डस्तरीय व ग्रामस्तरीय समिती तसेच पोलीस प्रशासनाने समन्वायाने काम करावे. यामध्ये नवीन रुग्णांची भर पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

पंढरपूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत नवीन भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपकार्यकारी अभियंता हनुमंत बागल, नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनिल वाळुंजकर, डॉ. सरोदे आदी उपस्थित होते.

सचिन ढोले म्हणाले, क्वारंटाईन सेंटरवर उपचारासाठी दाखल असेलेल्या रुग्णांना जेवणाचा तसेच तेथे आवश्यक असणाऱ्या साहित्याचा पुरवठा बांधकाम विभागाने करावा. आरोग्य विभागाने आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, असेही ढोले यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना तसेच अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सांगितले.

यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. 17 जुलै) सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 308 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 2 हजार 217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.81 टक्के असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 357 इतकी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.