सोलापूर- 'एन्काऊंटरमुळे हैदराबादमधील पशुवैद्यकीय पीडित मुलीच्या आत्म्यास शांती मिळाली असेल. तसेच देशभरातील पोलिसांना हिंमत मिळाली असेल,' अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा- 'माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल, तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे आभार'
हैदराबाद पोलिसांनी मुलींच्या आणि महिलांच्या संरक्षणासाठी जर एन्काऊंटर केला असेल, तर ही नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आरोपींचे एन्काऊंटर झाले असुन आता या प्रकरणाची फाईल बंद करावी जेणे करून पुन्हा या विषायवर खटला चालून वेळ जाणार नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना या 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालविण्याची गरज असल्याचेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार प्रणिती शिंदे यांनी महामानवाला अभिवादन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले.