ETV Bharat / state

सोलापूरात अवैधपणे गॅस सिलेंडर विकणाऱ्यांवर पोलिसांची धाड; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त - सोलापूरात अवैध गॅस धंद्या

अवैध गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांवर तालुका पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 15 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 7 संशयित आरोपींना अटक केले आहे.

Police raid illegal gas business
अवैध गॅस व्यवसायावर पोलिसांनी छापा
author img

By

Published : Nov 10, 2020, 7:56 AM IST

सोलापूर - घरगुती गॅस टाक्यामधून कमी किमतीने रिक्षामध्ये गॅस भरत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मुळेगाव शिवारामधील धवलनगर येथे कारवाई करण्यात आली.

दक्षिण सोलापूर पथक व सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये 15 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये मुख्य आरोपी नागेश बाबु साखरे, हा अवैधरित्या घरगुती गॅस विक्रीचा काळाबाजार करत असताना आढळून आला. त्याच्याकडून घरगुती गॅस टाक्या, इलेक्ट्रीक काटा, इलेक्ट्रीक मोटार, असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तलाठी भीमाशंकर रामण्णा भुरले यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, सुहास जगताप हे करीत आहेत.

हेही वाचा- शेतकऱ्यांना २ हजार २९७ कोटी रुपयांची मदत वितरित; विजय वडेट्टीवार यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.