ETV Bharat / state

लग्नाआधीच वधू-वरासह वऱ्हाड थेट पोलीस ठाण्यात; वाचा काय घडले? - Marriage Registration Act

नियमाप्रमाणे लग्नानंतर वधू वरासोबत सासरी जाते. मात्र बार्शित वधू-वर, नातेवाईक यांना थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

Barshi police Station, Solapur
बार्शी पोलीस स्टेशन, सोलापुर
author img

By

Published : Oct 1, 2020, 4:58 PM IST

सोलापूर - विवाहाची जय्यत तयारी झाली होती. विवाहाच्या रेशमी बंधनात अडकण्यास वधू-वर तयार होते. आशीर्वाद देण्यासाठी पाहुणेमंडळीदेखील हजर होती. नियमाप्रमाणे लग्नानंतर वधू वरासोबत सासरी जाते. मात्र बार्शित वधू-वर, नातेवाईक यांना थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

बार्शी तहसील कार्यालयात या बाल विवाहाबाबत माहिती देण्यात आली होती. तहसील कार्यालयाने ही माहिती त्वरित बार्शी शहर पोलीस स्टेशनला कळवली. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी त्वरित दखल घेतली व पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा ठाकूर, हवालदार लक्ष्मण भांगे, श्रीमंत खराडे, रविकुमार लगदिवे, मलंग मुलाणी, महिला पोलिस स्वाती डोईफोडे यांचे पथक विवाहस्थळी रवाना केले.

वधू-वराच्या वयाची तपासणी पोलिसांनी केली असता, वधूचे व वराचे दोघांचेही वय 19 असल्याचे निष्पन्न झाले. विवाह कायद्यानुसार वराचे वय 21 असणे आवश्‍यक आहे तर वधूचे 18 वर्षे. वधूचे वय कायद्यानुसार पूर्ण होते पण वराचे वय कायद्यानुसार दोन वर्षे कमी होते. म्हणून पोलिसांनी अखेर विवाह थांबवला. पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांनी संसार थाटण्यास निघालेल्या दोन्ही वर-वधूचे समुपदेशन केले. नातेवाईक, मित्रमंडळींना समज देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

बार्शी शहरातील एका प्रभागामध्ये एका तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आपण आयुष्यात यापुढे एकमेकांपासून विभक्त राहूच शकत नाही, अशी भावना दोघांमध्ये निर्माण झाली. अन्‌ त्या दोघांनी कुटुंबातील काही मोजक्‍या नातेवाइकांसमवेत विवाह करण्याचे नियोजन केले.

या प्रेमीयुगुलाचा विवाह मंगळवारी (ता. 29) घरासमोर दारात करण्याचा मुहूर्त ठरला दुपारी तीन वाजता करण्याचे ठरवण्यात आला. विवाहनोंदणी कायद्यानुसार अल्पवयीन बालविवाह होणार असेल तर असा विवाह कायद्यानुसार प्रशासन रोखत असल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. पण बार्शीत विपरीतच घडले. विवाहासाठी नवरदेव अल्पवयीन असल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कायद्यानुसार विवाह रोखला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.