बार्शी (सोलापूर) - तालुक्यातील खांडवी येथील ग्रामपंचायत सदस्याने आपल्या गावातील एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आकाश पांडुरंग दळवी असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपीचा पोबारा -
बार्शी शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खांडवी या गावात घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्य आकाश पांडुरंग दळवी यांनी गावातीलच एका महिलेवर अत्याचार केला. सोमवारी रात्री पीडिता ही लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. दरम्यान, समोरच राहत असलेल्या आकाश दळवी याने तिच्यावर बळजबरी करीत अत्याचार केला. यावेळी या महिलेने आरडाओरडा केला असता महिलेच्या पतीला जाग आली. मात्र, या महिलेचा पती घराबाहेर येण्याअगोदरच आरोपी आकाशने पोबारा ठोकला. ही घटना 21 जूनला मध्यरात्री घडली.
हेही वाचा - बाल्कनीत कबूतरांना खायला घालत होते कुटुंब, न्यायालयाने घातले प्रतिबंध..वाचा काय आहे प्रकार..
पीडितेला धमकी -
दुसऱ्या दिवशी गुन्हा नोंद करायला जाणाऱ्या पीडितेला काही गावकऱ्यांनी आडवले. गुन्हा नोंद केला तर वेगळ्याच केसमध्ये अडकवून टाकू, अशी धमकी दिली. मात्र, सोमवारी (28 जून) रोजी पीडितेने ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवीविरोधात तक्रार नोंद केली होती. यावरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आरोपीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा - Pench Tiger Reserve : वाघिणीची हरिणाच्या कळपावर झडप; पाहा व्हिडीओ