ETV Bharat / state

विठ्ठल मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना 61 लाखांची मदत, 5 पूरबाधित गावांचे पुनर्वसनही करणार

author img

By

Published : Aug 10, 2019, 11:27 PM IST

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना 61 लाखाची मदत जाहिर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना 61 लाखाची मदत

सोलापूर - सांगली जिल्ह्यातील पलूस बोट अपघातामधील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केली आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण बेपत्ता आहेत.

विठ्ठल मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना 61 लाखाची मदत
या अपघातातील लोकांसाठी 36 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 5 पूर बाधित गावे दत्तक घेऊन, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मंदिर समिती करणार आहे. म्हणजेच एकूण 61 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.
रुक्मिणी मातेला अर्पण करण्यात आलेल्या साड्या या पूरग्रस्त महिलांना देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाशी सल्लामसलत करून लवकरच पुनवर्सनाची पाच गावे निश्चित केली जाणार असल्याचेही डॅा. भोसले यांनी सांगितले.

Intro:mh_sol_05_vitthal_help_7201168

विठ्ठल मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना 61 लाखाची मदत,
5 पूरबाधित गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेणार

सोलापूर-
सांगली जिल्ह्यातील पुलुस येथील अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केली आहे. Body:सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पुरामुळे 12 जण मृत्युमुखी पडले, तर 6 जण बेपत्ता आहेत. या पूरबाधितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखाची मदत मंदिर समिती करणार आहे. त्यासाठी 36 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच 5 पुरबाधित गावे दत्तक घेऊन, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची म्हणजेच एकूण 25 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.
तसेच रुक्मिणी मातेला अर्पण करण्यात आलेल्या साड्या या पूरग्रस्त महिलांना रुक्मिणी मातेच्या साड्या देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशासनाशी सल्लामसलत करून लवकरच पुनवर्सनाची पाच गावे निश्चित केली जाणार असल्याचेही अतुल भोसले यांनी सांगितले.

डॉ. अतुल भोसले.
(श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.