ETV Bharat / state

Pandharpur crime : पुष्पा चित्रपटाची पुनरावृत्ती; 138 किलो चंदन पोलिसांनी केले जप्त - पुष्पा चित्रपटाची पुनरावृत्ती

पंढरपूर तालुक्यातून 138 किलो चंदन ( Pandharpur police seized 138 kg sandalwood ) जप्त केले आहे. चंदनाची तस्करी करणार्‍या दोघा जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे.

Pandharpur crime
Pandharpur crime
author img

By

Published : Feb 9, 2022, 6:10 PM IST

पंढरपूर - दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा या (Pushpa The Rise Movie) चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट लाल चंदन तस्करीवर आधारित आहे. तशाच प्रकारचा एक गुन्हा पंढरपूर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातून 138 किलो चंदन ( Pandharpur police seized 138 kg sandalwood ) जप्त केले आहे. चंदनाची तस्करी करणार्‍या दोघा जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे.

पोलीसांनी दिली माहिती

मोहोळ तालुक्यातील पेनुरयेथून टेम्पोमधून चंदन पंढरपूर तालुक्यातील तीन रस्ता घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पथक तीन रस्ता येथे तैनात करण्यात आले. पेनुरच्या दिशेने येणार्या टेम्पो वाहनाची तपासणी केली असता, तेथील चार पोत्यांमध्ये 138 किलो चंदन आढळून आले. गाडी चालक रमेश महादेव तेलंग व कचरूद्दीन जमादार यांना अटक करण्यात आली आहे.पंढरपुर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सात लाख रुपये किमतीचे वाहन व आठ लाख रुपये किमतीचे चंदन असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिलिंद पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा - Brothers killed sister's husband : मनाविरुद्ध लग्न केल्याने भावांनी केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.