ETV Bharat / state

पंढरपूर पोलिसांकडून दुचाकीची चोरी करणारी टोळी जेरबंद, 46 मोटरसायकल केल्या जप्त - Pandharpur Latest

सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या चोरी करणाऱ्या टोळीला पंढरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दुचाकीची चोरी करणारी टोळी जेरबंद
दुचाकीची चोरी करणारी टोळी जेरबंद
author img

By

Published : Jun 11, 2021, 2:03 PM IST

पंढरपूर - राज्यातील आंतरजिल्हा दुचाकी मोटरसायकलची चोरी करणारी टोळी पंढरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे. एक लाख रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत किमतीच्या 46 मोटरसायकल व पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल या तीन आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली आहे.

दुचाकीची चोरी करणारी टोळी जेरबंद

पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. 21 मे रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरी केल्याची पहिली तक्रार नोंद करण्यात आली होती. पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून या गुन्ह्याची चौकशी सुरू करण्यात आली. त्यातील पंढरपूर येथील नामदेव बबन चुनाडे याची वर्तवणूक संशयास्पद वाटल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रकटीकरण शाखेकडून चौकशी केली असता, मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळी संदर्भात त्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नामेदव बबन चुनाडे, विश्वास ढगे, अतुल नागनाथ जाधव, शकिल बंदेनवाज शेख, अभिमान उर्फ आबा अर्जुन खिलारे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक सातपुते यांनी दिली.

आंतरजिल्हा टोळीकडून 46 मोटरसायकल जप्त

पंढरपूर शहर पोलिसांकडून तपासाची चक्र जलदगतीने फिरून मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. पंढरपूर शहर पोलिसांनी चार आरोपींपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी चोरून विकलेल्या 42 मोटरसायकल पोलीसांनी जप्त केल्या आहेत. या मोटरसायकलची पन्नास हजार पासून ते एक लाखांपर्यंत किमतीच्या आहेत. त्याची अंदाजे किंमत 15 लाख रूपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अशी माहिती दिली. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण पवार, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - नागपुरात शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण करून खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.