सोलापूर - पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष साधना भोसले यांना देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव हे देखील उपस्थित होते.
कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष अनिल गोयल, किशोर खिलारे, जयंत पवार, संजय माने, प्रीतम येळे, नवनाथ तोडकर या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याशी चर्चा केली.
सरकारने लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगातील दहा हजार रुपयांची रक्कम देण्यात यावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली होती. मुख्याधिकार्यांनी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे पाच हजार रुपयांची रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर रजा व उपदानाची रक्कम देण्यात यावी
- कोरोना काळात नागरी भागात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी जोखीम पत्करून काम केल्याने वेतनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर अदा करावे
- कोरोना महामारीत काम करताना कोरोनाची लागण झालेल्या चार कर्मचाऱ्यांना नियमानुसार एक लाख रुपये देणे
यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी पोपट जाधव, चिदानंद सर्वगोड, धनाजी वाघमारे, पराग डोंगरे, दर्शन वेळापुरकर, नागेश धारुरकर, सतीश क्षीरसागर, सुनील सोनार, श्रीराम जोजारे आदी उपस्थित होते.