ETV Bharat / state

कार्तिकी वारी : दोन वर्षानंतर विठूरायाची नगरी टाळमृदुंगाच्या गजरात दुमदुमली - प्रबोधनी एकादशी

कार्तिकी यात्रा निमित्ताने पंढरपुरात विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी भक्त भाविक दाखल झाले आहे. रुक्मिणी मंदिरात सुदर फुलांची आरास तयार करण्यात आली आहे.

Pandharpur Kartik Ekadasi Yatra 2021
कार्तिकी वारी : दोन वर्षानंतर विठूरायाची नगरी टाळमृदुंगाच्या गजरात दुमदुमली
author img

By

Published : Nov 15, 2021, 6:43 AM IST

पंढरपूर - दोन वर्षानंतर पंढरपुरात कार्तिकी यात्रा निमित्ताने जयघोषात व टाळमृदुंगाच्या आवाज घुमू लागला आहे. विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी भक्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रबोधनी एकादशी निमित्ताने रुक्मिणी मंदिरात सुदर फुलांची आरास तयार करण्यात आली आहे.

रुक्मिणी मंदिरात सुदर फुलांची आरास

कोरोना संर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 3 हजार 289 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 15 पोलीस उपअधिक्षक, 41 पोलीस निरिक्षिक, 178 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 1 हजार 955 पोलीस कर्मचारी व 1 हजार 100 होमगार्ड तसेच दोन एसआरपीएफ कंपनीच्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद तालुका आरोग्य विभाग या सर्वांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तसेच शहर परिसरातील ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यामध्ये यात्रा कालावधीत उभारण्यात आलेल्या सहा आपत्कालीन मदत केंद्रावर औषधोपचार व प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये चंद्रभागा वाळवंट, पत्राशेड , 65 एकर परिसर, पोलीस संकुल, भक्तनिवास, संसर्गजन्य रुग्णालय आणि गोपाळपुर असा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.