ETV Bharat / state

'ती' शेतकरी कन्या नौदलाच्या परीक्षेत देशात दुसरी; गरिबीवर मात करत संघर्ष पूर्णत्वास - कोस्ट गार्ड असिस्टंट कमाडन्ट पल्लवी काळे

माढा तालुक्यातील भोगेवाडीच्या सुनील व संतोषी काळे या शेतकरी दांम्पत्याची कन्या पल्लवी ही नौदल परीक्षेत देशात दुसरी आली आहे. भोगेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमाडन्ट पदासाठी निवड झाली.

pallavi kale from solapur scores 2nd in naval examination
'ती' शेतकरी कन्या नौदलाच्या परीक्षेत देशात दुसरी
author img

By

Published : Dec 6, 2019, 2:20 PM IST

सोलापूर - माढा तालुक्यातील भोगेवाडीच्या सुनील व संतोषी काळे या शेतकरी दांम्पत्याची कन्या पल्लवी ही नौदल परीक्षेत देशात दुसरी आली आहे.

pallavi kale from solapur scores 2nd in naval examination
पल्लवी काळे कुटुंबासोबत

भोगेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमाडन्ट पदासाठी निवड झाली आहे. भोगेवाडी गावात भारतीय सैन्य दलात अनेक तरुण सीमेवर मातृभूमीचे रक्षण करत आहेत. त्यातच आता पल्लवीच्या रूपाने गावाला नौदलातील पहिली महिला अधिकारी मिळणार आहे. केंद्रीय स्टाफ सिलेक्शन च्या घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने दुसरा क्रमांक पटकावलाय.

पल्लवीचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण भोगेवाडी जि.प.प्राथमिक शाळेत झाले आहे. पाचवी ते बारावीचे शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा;तर, मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी सिंहगड इन्स्टिट्युट येथे पूर्ण केली आहे. ती पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती.

या यशानंतर बोलताना, प्रत्यकाने आई वडिलांच्या कष्टांची जाण बाळगून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले. ध्येय सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य, सकारात्मक विचार आवश्यक असल्याचे पल्लवीने म्हटले.

Intro:Body:भोगेवाडी च्या शेतकरी दामंपत्याची लेक नौदल परीक्षेत देशात दुसरी अन् झाली क्लास वन अधिकारी

फोटो-

प्रतिनिधी | माढा
माढा तालुक्यातील भोगेवाडी च्या सुनील व संतोषी काळे या
शेतकरी दामपत्याची लेक पल्लवी सुनील काळे ही नौदल परीक्षेत देशात दुसरी आली आहे.भोगेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवी ची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमाडन्टपदी( क्लास वन अधिकारी)निवड झाली आहे.

भोगेवाडी गावात भारतीय सैन्य दलात अनेक तरुण सीमेवर मातृभूमीचे रक्षण करताहेत. त्यातच आता पल्लवी च्या रुपाने नौदलातील पहीली महिला अधिकारी ती ठरली आहे.
केंद्रीय स्टाॅफ सिलेक्शन च्या घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने दुसरा क्रमांक पटकावत क्लास वन अधिकारी बनली आहे.
पहिली ते चौथी पर्यंत चे शिक्षण भोगेवाडी जि.प.प्राथमिक शाळेत,पाचवी ते बारावी चे शिक्षण
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा,तर मॅकेनिकल इंजिनियरिंग ची पदवी सिंहगड इन्सट्युट पुणे येथे पुर्ण करुन ति पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती.तिने दिलेल्या
पहिल्याच स्पर्धा परीक्षेत तिने प्रयत्न अन् जिद्दीच्या जोरावर हे उत्तुंग यश मिळवले.पल्लवी च्या निवडीमुळे गावचे नाव रोषण तर झालेच आहे शिवाय पल्लवी ने कुटुंबाला प्रतिष्ठा देखील मिळवून दिली आहे.सुनील काळे हे सरपंच पदावरुन गावची धुरा सांभाळण्याबरोबरच स्वतःह ची लेक देखील घडवली असुन पल्लवी ची आई देखील गावच्या माजी सरपंच आहेत.

कोट-प्रत्यकांने
आई वडिलांच्या कष्टांची जाण मनी बाळगुन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.आजची तरुणाई अभ्यास करताना पुस्तक दुर आणी मोबाईल जवळ अशी सवय लावुन घेताना दिसतात.ध्येय सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य,सकारात्मक विचार सोबतीला हवेत-पल्लवी काळे,नौदल अधिकारी

कोट) आज खर्या अर्थाने कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटतंय.अनेक अडथळे पार करुन आम्ही पल्लवी च्या शिक्षणाचा खर्च भागवला.पल्लवी ने आमच्या कष्टाचे पांग फेडलं.आई वडिलाला आणखी दुसरं काय हवं असत.आज आम्ही आनंदुन गेलो आहोत-सुनिल कांबळे व संतोषी काळे,आई वडीलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.