ETV Bharat / state

कार्तिकी वारीत पालखी व दिंड्यांना पंढरपुरात येण्यास बंदी - नाना पटोले यांचेशी चर्चा

कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या पालखी व दिंड्यांना पंढरपूरमध्ये येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत एकादशी सोहळ्यादिवशी 7 ते 8 लाख भाविकांची गर्दी होते. त्यामुळे ही गर्दी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर येथे केंद्रीत झाल्यास कोरोनाचा मोठा धोका होऊ शकेल. यामुळे कार्तिकीला कोणत्याही दिंड्यांना अथवा वारकर्‍यांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Karthiki Wari
कार्तिकी वारी
author img

By

Published : Nov 20, 2020, 4:09 PM IST

पंढरपूर - पंढरपुरात 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी वारी होणार आहे. कार्तिकीसाठी येणाऱ्या पालखी व दिंड्यांना पंढरपूरमध्ये येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. कार्तिकी वारीच्या सर्व सोहळ्यावर राज्य सरकारकडून बंदीचे आदेश, विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सु. पा. साळुंखे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बंदी

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्यामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून कार्तिकी वारीसाठी वारकरी व भक्त पंढरपुरात दाखल होत असतात. कार्तिकी यात्रा कालावधीत एकादशी सोहळ्यादिवशी 7 ते 8 लाख भाविकांची गर्दी होते. त्यामुळे ही गर्दी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर येथे केंद्रीत झाल्यास कोरोनाचा मोठा धोका होऊ शकेल. यामुळे कार्तिकीला कोणत्याही दिंड्यांना अथवा वारकर्‍यांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे आहे

कार्तिकी यात्रा रद्द करावी, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

कार्तिकी वारी एकादशी दिवशी पंढरपुरात संचारबंदी करावी व होणारी गर्दी टाळण्यासाठी यात्रा रद्द करावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला होता.

हेही वाचा - अक्षय कुमारने यूट्यूबर राशिद सिद्दीकीवर ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा

महाराज मंडळींची विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याशी चर्चा

वारकरी सांप्रदायाच्या महाराज मंडळींनी 18 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. यामध्ये मर्यादित स्वरुपाच्या यात्रेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वारकरी सांप्रदायाच्यावतीने सांगण्यात आले.

हेही वाचा - विक्की कौशलने केला नव्या चित्रपटाच्या शुटिंगचा 'शुभ आरंभ'

आगामी काळात येणार्‍या कार्तिकी यात्रेस शासनाचे सर्व नियम पाळत परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसह आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यात्रेला यंदा परवानगी मिळावी, या मागणीसाठी यात्रा समन्वय समितीचे सुधाकर महाराज इंगळे, राणा वासकर महाराज, रामकृष्ण वीर महाराज, निवृत्ती रामदास महाराज यांनी पदाधिकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.