ETV Bharat / state

Solapur Balloons: ईदगाह मैदानासमोर पाकिस्तान समर्थनार्थ फुग्यांची विक्री; मुस्लिमांना बदनाम करण्याचे कारस्थान एमआयएमचा आरोप

सोलापूर शहरातील दोन ईदगाह मैदानासमोर पाकिस्तानच्या समर्थनार्थ फुग्यांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दोन्ही फुगे विक्रेत्यांना अटक केली आहे. तसेच त्यांना फुगे पुरवणाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे. होटगी रोडवरील शाही आलमगिर ईदगाह मैदानासमोर पाकिस्तान जिंदाबाद, लव पाकिस्तान लिहिलेले फुगे विक्री केली जात होती. ही बाब नमाज पठण करणाऱ्या लोकांना समजल्यानंतर त्यांनी तेथे तैनात असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी फुगेवाल्याला ताब्यात घेतले. अजय पवार (रा पारधी वस्ती,विजापूर रोड ,सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शहाराच्या आणखीन एका ईदगाह येथे अशा प्रकारचे फुगे विक्री करणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

पाकिस्तानच्या फुग्यांची विक्री
पाकिस्तानच्या फुग्यांची विक्री
author img

By

Published : Jun 29, 2023, 5:20 PM IST

Updated : Jun 29, 2023, 10:36 PM IST

पोलीस उपायुक्त विजय कबाडे

सोलापूर: शहरातील दोन ईदगाह मैदानासमोर पाकिस्तानच्या समर्थनार्थ फुग्यांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी अजय पवार आणि शिवाजी लक्ष्मण पवार या दोन फुगे विक्रेत्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या विक्रेत्यांना फुगे पुरवणाऱ्या रोशन एंटरप्राइजेसच्या मालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ईदगाह मैदानात मुस्लीम बांधव हे आपल्या लहान मुलांना घेऊन नमाज पठणासाठी जात होते, तेव्हा त्यांना ही बाब लक्षात आली. या फुग्यांवरती लव पाकिस्तान असे लिहिले होते. दरम्यान मुस्लीम बांधवांनी या फुगे विकणाऱ्या अजय पवार नावाच्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान एमआयएमचे नेते रियाज सय्यद यांनी ताबडतोब विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले आहे. हे एक षडयंत्र असून मुस्लीम समाजाला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू असल्याची माहिती रियाज सय्यद यांनी दिली.

चौकशी सुरू : विजापूर नाका पोलिसांनी या व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतला व्यक्ती होटगी रोड येथील शाही आलमगिर ईदगाह मैदानावर पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री करत होता. या संशयित इसमास मुस्लिम बांधवानी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हे मुस्लीम धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप एमआयएम कार्यकर्त्यांनी केला आहे. संशियत व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी याचे निवदेन एमआयएम कार्यकर्त्यांनी विजापूर नाका पोलिसांना दिले आहे. यावर पोलीस निरीक्षक हनपुडे पाटील म्हणाले की, अधिक चौकशी करून कठोर कारवाई करणार तसेच पाकिस्तान समर्थनार्थ असलेली फुगे सोलापुरात आली कशी याचीही अधिक चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले.

फुगेवाला व पाकिस्तान समर्थनार्थ फुगे जप्त : नमाज सुरू होण्याअगोदर काही मुस्लिम बांधवाच लक्ष फुगे विक्रेत्यावर गेले. फुगेवाल्याला पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री करत आहे याचा जाब विचारला. हे फुगे किती जणांना विक्री केले, असे विचारले असता फुगेवाल्याची भांबेरी उडाली होती. हा फुगा एखाद्या मुस्लिम लहान मुलाने हातात घेतला असता आणि त्याचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असते. तर त्यावर मोठी टीका झाली असती. दरम्यान विजापूर नाका पोलिसांनी या फुगेवाल्याला ताब्यात घेतले आहे.

एमआयएमच्या वतीने कारवाईचे निवेदन : एमआयएम नेते रियाज सय्यद यांनी याची तात्काळ गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनकडे निवेदन दिले आहे. मुस्लिम धर्मीयांच्या सणादिवशी ईदगाह मैदानावर पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री केल्याची बाब गंभीर आहे, हे फुगे विक्री करणारे सर्वसामान्य व गोरगरीब आहेत. यामागे षडयंत्र रचणारे कोण आहेत. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विजापूर नाका पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. सीआयडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

कोणत्याही जाती धर्माचे आरोपी असतील तर त्यांवर कठोर कारवाई होईल. सोलापुरात पाकिस्तान समर्थनार्थचे फुगे विक्री करणाऱ्यावर सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई होईल. हे फुगे कुठुन आणली, कशी काय विक्री केली याचा तपास केला जाणार आहे.- पोलीस उपायुक्त विजय कबाडे

Last Updated : Jun 29, 2023, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.