पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारणाऱ्यासाठी शाळा व मंगल कार्यालये ताब्यात घेतली जात आहेत. मात्र माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावात पहिल्या लाटेतील कोविड सेंटरचे एक रुपये आला नसताना दुसऱ्या लाटेतील कोविड सेंटर उभारण्यात मंगल कार्यालयासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या मालकाने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत माळशिरस प्रशासनाकडे विचारणा केली असता, कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
पहिल्या लाटेतील कोविड सेंटरचा मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा-
सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध संकुलन व मंगल कार्यालय ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटर सुरू उभारण्यावर भर दिला जात आहे. त्या प्रमाणे कोरोनाच्या पहिल्या लाटेत नातेपुते येथील मधुर मिलन हे मंगल कार्यालय कोरोना रुग्णांच्या अलगीकरणासाठी प्रशासनाने देखभाल दुरुस्तीसह भाडेतत्वावर ताब्यात घेतले होते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने इमारत मंगलकार्यालायचे मालक अभिजित दोशी यांच्या ताब्यात दिली होती. मात्र, या काळात मंगलकार्यालाचा वापर केल्याबद्दलचा मोबदला व देखभाल दुरुस्ती शासनाने अद्यापपर्यत दिलेली नाही. त्यातच आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर प्रशासानाकडून पुन्हा एकदा विलगीकरण कक्ष निर्मितीसाठी दोशी यांच्या मंगलकार्यालयाची मागणी करत त्यांच्यावर दबाव निर्माण केला आहे.
कर्ज हप्ते, वीज बिल थकले, आता इमारत देणार नाही-
गेल्या दीड वर्षापासून कोरोना पार्श्वभूमीवर लग्न कार्यक्रमाना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून मंगल कार्यायालत बंद असल्यामुळे मालकाचे कर्जाचे हप्तेते थकले आहेत. तसेच वीज बिल थकल्यामुळे कार्यालयाची वीज तोडण्यात आली आहे. त्यातूनच पहिल्या कोविड सेंटरचे पैसेही प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. प्रशासनाने लाईट बिल सुद्धा दिले नाही. आम्ही स्वतःच्या पैशाने लाईट बिल भरून परिसरातील झाडे जगवली आहेत. मागच्यावेळचे पैसे मिळाले नसताना. आता प्रशासन दुसऱ्यांदा मंगलकार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे यावेळी काहीही झाले तरी आम्हीही आमच्या मालकीची इमारत प्रशासनाला देणार नाही, असा इशारा दोशी यांनी दिला आहे.
तालुका प्रशासन अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ
गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालयाची मालक दोशी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडून दुसऱ्या लाटेतील कोविड सेंटरसाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. त्यातच मंगल कार्यालयाात राहणाऱ्या कुटुंबावर प्रशासनाकडून नोटीस जाहीर करण्याात आली. त्यामुळे मंगल कार्यालय चे मालक दोशी यांच्यावर उपोषणाची वेळ आली आहे.याबाबत प्रशासनाकडून विचारणा केली असता प्रशासनाचे अधिकारी माध्यमांसमोर बोलायला तयार नाहीत. कोविड केअर सेंटर साठी प्रशासनाकडून अशाप्रकारे व्यावसायिकांवर दबाव आणला जात आहे.