ETV Bharat / state

उजनीच्या पाण्या संदर्भातील 'तो' आदेश रद्द - इंदापूरचे आमदार दत्ता भरणे

उजनी जलाशयातून बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी शेटफळगडे या प्रकल्पाला देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. आज तो निर्णय माघारी घेणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

उजनी पाणी संदर्भातील आदेश रद्द
उजनी पाणी संदर्भातील आदेश रद्द
author img

By

Published : May 19, 2021, 10:44 AM IST

पंढरपूर - उजनी धरणातल्या पाच टीएमसी पाण्यावर सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये राजकारण तापले होते. उजनी जलाशयातून बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून शेटफळगडे या प्रकल्पाला देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्यातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. महाविकास आघाडी व पालकमंत्री भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात आंदोलन करण्यात आली होती. आज तो निर्णय माघारी घेणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.

उजनी पाणी संदर्भातील आदेश रद्द

उजनी पाणी वाटपावरून बरेच गैरसमज : जलसंपदा मंत्री

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार व स्थानिक नेत्यांनी उजनीच्या पाण्याबाबत आग्रही भूमिका मांडली आहे. उजनी जलाशयातून सोलापूर जिल्ह्याला जे पाणी देण्यात येणार आहे, त्या पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागणार नाही, असे आश्वासनही देण्यात आले आहे. जलसंधारण विभागाकडे 20 एप्रिल रोजी एक आदेश आला होता. उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्यासंदर्भात 22 एप्रिल रोजी निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी मंगळवारी सांगितले.

पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी, उजनी जलाशयातून पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना द्यावी अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात आदेशही जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सोलापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये भरणे यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगीतले होते की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचा एक थेंब जरी इंदापूरला नेला, तर मी राजकारण सोडून देईन. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना व भाजप यांच्याकडून पालकमंत्र्यांविरुद्ध जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. या सर्व उजनीच्या घडामोडीनंतर पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या कार्यप्रणालीवर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचे पालकमंत्रिपदही धोक्यात आल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; एक पॉझिटिव्ह, २० संशयितांवर नागपुरात उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.