ETV Bharat / state

सोलापुरातील नरखेड येथे 'नोटा'ने केले विरोधकांचे डिपॉझिट जप्त - gram panchayat news

नरखेड या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे एका प्रभागांमध्ये एक उमेदवार म्हणून नोटा आपला उमेदवार असल्याचे घोषित केले होते. ग्रामस्थांनीही नोटा यालाच उमेदवार समजून त्या प्रभागात प्रथम क्रमांकाची म्हणजेच नोटाला 436 मते मिळालेली आहेत. मात्र उमेश पाटील यांनी नरखेड ग्रामपंचायतमधील सर्व उमेदवार निवडून आणले आहेत.

उमेश पाटील
उमेश पाटील
author img

By

Published : Jan 19, 2021, 7:56 PM IST

पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी नरखेड या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे एका प्रभागांमध्ये एक उमेदवार म्हणून नोटा आपला उमेदवार असल्याचे घोषित केले होते. ग्रामस्थांनीही नोटा यालाच उमेदवार समजून त्या प्रभागात प्रथम क्रमांकाची म्हणजेच नोटाला 436 मते मिळालेली आहेत. मात्र उमेश पाटील यांनी नरखेड ग्रामपंचायतमधील सर्व उमेदवार निवडून आणले आहेत.

प्रभाग पाचमधून नोटाला सर्वाधिक मते

नरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेश पाटील यांच्या पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवार वृषाली पाटील यांचा उमेदवारी अर्ज संगणकीय चुकीमुळे बाद झाला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात उभे असलेल्या दिपाली कोल्हाळ (१४३) व सविता खंदारे (१६३) या दोन उमेदवारांपैकी एकालाही निवडून न देता सूज्ञ मतदारांनी नोटाला मतदान करून, ग्रामीण भागातदेखील मतदार किती जागरुक असू शकतो, याचे सबंध देशासमोर उदाहरण घालून दिले.

उमेश पाटील यांच्याकडून नोटा उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांच्या पार्टीकडून एका प्रभागात एक उमेदवार म्हणून नोटा हाच आपला उमेदवार घोषित केला होता व त्यालाच मतदान करावे, असे मतदारांना आवाहन केले होते. मतदारांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत देशात इतिहास घडवला व अक्षरश नोटाला 434 मतदान करून निवडून दिले. उर्वरित सर्वच्या सर्व उमेदवारदेखील उमेश पाटील यांच्या पार्टीचे निवडून आले.

नोटाला विजय करण्याची मागणी

नरखेड ग्रामपंचायत पाच प्रभागातून नोटाला सर्वाधिक मते मिळाल्यामुळे नोटाला विजयी घोषित करावे, अशी मागणी उमेश पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमानुसार परिस्थितीत सदर ठिकाणी नोटाला सर्वाधिक मतदान झाल्यास, त्या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्याची तरतूद केली आहे. परंतु सदर आदेश २०१८मधील नगरपालिका निवडणुकीच्या काळात काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदर नियम लागू आहे किंवा नाही या बाबतीत प्रशासनात संभ्रम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.