पंढरपूर - राज्य सरकारकडून आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी दहा मानाच्या पालख्यांना एसटीमधून पंढरपूरला प्रस्थान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ज्या वारकऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे देनही डोस घेतले असतील अशाच वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश द्यावा, अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी केली आहे.
वारकऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन करावे - भोसले
सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती भयावह झाली होती. त्यात पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी होती. पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर आहे. या परिसरामध्ये नागरिकांची घनता अधिक आहे. त्यामुळे वारीसाठी पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांनी जबाबदारी घेऊन, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. ज्या वारकऱ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, अशाच वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी साधना भोसले यांनी केली आहे.
हेही वाचा - मरुनही जगेल मी... राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संचारी विजय मृत्यूनंतरही अवयवदानातून राहणार जीवंत