ETV Bharat / state

एसआरपीएफ जवानाकडून पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून गोळीबार, एक जण ठार - जवान गोरोबा तुकाराम महात्मे

बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे एसआरपीएफ जवानाने पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री पाउणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वैराग पोलिसांनी जवान गोरोबा तुकाराम महात्मे याला अटक केली आहे. नितीन भोसेकर (रा.सापनई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), असे मृताचे नाव आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 21, 2021, 10:24 PM IST

सोलापूर - बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे एसआरपीएफ जवानाने पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री पाउणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वैराग पोलिसांनी जवान गोरोबा तुकाराम महात्मे याला अटक केली आहे. नितीन भोसेकर (रा.सापनई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), असे मृताचे नाव आहे.

माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपी गोरोबा महात्मे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत होता. त्यामुळे त्याचा मेहुणा व दोन मित्र भांडण मिटवण्यासाठी आले होते. पण, त्यावेळी भांडण विकोपाला गेले. त्यामुळे गोरोबा याने स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात नितीन भोसेकर याचा मृत्यू झाला तर गोरोबा यांचा भाऊ बालाजी महात्मे गंभीर जखमी झाला आहे.

वैराग पोलिसांनी जवानाला घेतले ताब्यात

नितीन बाबुराव भोसकर याचा मृतदेह सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. एसआरपीएफ जवान गोरोबा तुकाराम महात्मे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहीर करत आहेत.

हेही वाचा - पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने केला खून, चोवीस तासात मंद्रुप पोलिसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.