ETV Bharat / state

सोलापूर : टेंभुर्णी-अहमदनगर मार्गावरील कालव्यात कार कोसळली, पत्नी ठार

टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमहामार्गावरील कुंभेज फाटा (ता. करमाळा) येथे अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने जवळच्या 70 फुट खोल कोरड्या कालव्यात चारचाकी पडली. चारचाकीत प्रवास करणाऱ्या नवदाम्पत्यांपैकी पत्नीचा मृत्यू झाला तर पती जखमी झाला आहे.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Dec 5, 2019, 12:48 PM IST

सोलापूर - टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्या जवळचा अरुंद पूल आणि रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पुलावरून थेट 70 फूट खोल कालव्यात कोसळली. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जखमी झाला आहे. यापूर्वी या पुलावरून जळगाव जिल्ह्यातील एक जीप रस्त्याचा अंदाज न आल्याने कालव्यात कोसळली होती. त्या अपघातामध्ये तीन जण ठार झाले होते.

स्वाती साईकुमार रेड्डी जक्का (वय 28 वर्षे) हीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती साईकुमार सतीश रेड्डी जक्का (वय 29 वर्षे, दोघे रा. बंगळूर, हल्ली मुक्काम गोरेगाव वेस्ट, मुंबई) हे जखमी झाले. मंगळवारी (दि 3 डिसेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिर्डीहून बंगळूरकडे चारचाकीमधून रेड्डी पती-पत्नी दोघे जात होते. करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ कारचालक साईकुमार याला रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार थेट 70 फूट खोल कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत नवदांपत्यापैकी स्वाती जागीच ठार झाली. तर अपघातानंतर कार मधील एअरबॅग उघडल्याने पती साईकुमार बचावला आहे. या ठिकाणी धोकादायक सूचना फलक लावलेला नाही. उंच संरक्षक कठडेही नाहीत.

हेही वाचा - सोलापुरात गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी

टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गावरील टेंभुर्णी ते जातेगाव या 65 किमी अंतर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम खासगीकरणातून सुप्रीम कंपनीने घेतले होते. पण, गेल्या पाच वर्षांपासून कंपनीने काम बंद केले आहे. या मार्गावर अर्धवट रस्त्याची कामे धोकादायक पुल याकडे दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग नुसते खड्डे बुजवण्यात धन्यता मानत आहेत. कुंभेज फाट्याजवळ असलेल्या कालव्यावरील पुलाचा रस्ता अत्यंत अरुंद असून चार पदरी असलेला रस्ता लगेच अरुंद होत असल्याने परप्रांतीय वाहनचालकांना भरधाव वेगात रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होतात.

हेही वाचा - सोलापूर : माढा तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

Intro:Body:करमाळा - टेंभुर्णी - अहमदनगर राज्यमहामार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्यावर अपघात ; अपघातात एक ठार एक जखमी

Anchor - टेंभुर्णी अहमदनगर राज्यमार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्या जवळ पुलावरील अरुंद रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पुलावरून थेट 70 फूट खोल कालव्यात कोसळून एक जण जागीच ठार तर एक जखमी झाले आहे तर यापूर्वी या अरुंद रस्त्यावरील पुलावरून जळगाव जिल्हयातील बोलेरो गाडी रस्त्याचा अंदाज न आल्याने कालव्यात कोसळून तीन जण ठार झाले होते.

Vo - स्वाती साई कुमार रेड्डी जक्का वय 28 यांचा जागीच मृत्यू झाला व तिचा पती साईकुमार सतीश रेड्डी जक्का वय 29 राहणार दोघे गोरेगाव वेस्ट मुंबई मूळ राहणार बंगळूर हे जखमी झाले मंगळवार दि 3 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिर्डीहून बंगळूर कडे जाणाऱ्या कारणे बी ई - 27 - 71 65 मधून रेडी पती-पत्नी दोघे जण होते करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा जवळ कारचालक साईकुमार याला रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार थेट 70 फूट खोल कालव्यात कोसळली या दुर्घटनेत नवदांपत्य पैकी स्वाती जागीच ठार झाली तर अपघातानंतर कार मधील एअरबॅग उघडल्याने पती साईकुमार बचावला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रवासी सहलीला जात असताना कुंभेज फाटा नजीक असलेल्या याच पुलावरून बोलेरो गाडी चालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने मध्यरात्री कालव्यात कोसळून तीन प्रवासी ठार झाले होते. या ठिकाणी धोकादायक सूचना फलक लावलेला नाही उंच संरक्षक कठडे लावण्यात आलेले नाहीत.

टेंभुर्णी अहमदनगर राज्यमार्गावरील टेंभुर्णी ते जातेगाव या 65 किमी अंतर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम खासगीकरणातून सुप्रीम कंपनीने घेतले होते पण गेल्या पाच वर्षापासून कंपनीने काम करणे बंद केले आहे या मार्गावर अर्धवट रस्त्याची कामे धोकादायक फुल याकडे दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग नुसते खड्डे बुजवण्यात धन्यता मानत आहे कुंभेज फाटा जवळ असलेल्या कालव्यावरील पुलाचा रस्ता अत्यंत अरुंद असून चार पदरी असलेला रस्ता पुन्हा जवळच अरुंद असल्याने परप्रांतीय वाहनचालकांना भरधाव वेगात रस्त्याचा नीट अंदाज येत नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.