सोलापूर - आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यासाठी लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढपूरला येत असतात. या वारकऱ्यांना पंढरी नगरीचे रूप सुदर दिसावे यासाठी मंदिर समितीच्यावतीने दर्शन मंडप तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
येत्या १२ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आषाढीवारी पूर्वीच शहरात महास्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसरात वारीकाळात स्वच्छता राहावी यासाठी पालिकेचे सुमारे 1 हजार 600 कर्मचारी स्वच्छता दूत म्हणून सेवा करणार आहेत.