ETV Bharat / state

विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास मनाई, अनुचित घटना घडू नये म्हणून मंदिर समितीचा निर्णय - aashadhi wari

आषाढी वारीच्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व नामदेव पायरीजवळ नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नारळाच्या सालीमुळे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नारळ बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास मनाई
author img

By

Published : Jul 3, 2019, 11:09 AM IST

सोलापूर - आषाढी वारीच्या काळात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व नामदेव पायरीजवळ नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नारळाच्या सालीमुळे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नारळ बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास मनाई

पंढरपूर शहरात आषाढी वारीनिमित्त पुढील १५ दिवस लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. १७ जुलै २०१९ पर्यंत आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांकडून नामदेव पायरी व परिसरात नारळ फोडण्याने चिखल होण्याची शक्यता आहे. नारळाच्या सालीमुळे त्या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास बंदी घातली आहे. हे आदेश ३ जुलै २०१९ ला सायंकाळी ६ वाजल्यापासून ते दिनांक १७ जुलै २०१९ ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील, असेही उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी ढोले यांनी आदेशात सांगितले आहे.

Intro:R_MH_SOL_03_JULLY_2019_NARAL_BANDI_IN_PANDHARPUR_S_PAWAR
विठ्ठल मंदिरात नारळ फोडण्यास मनाई
सोलापूर-
आषाढी वारीच्या काळात विठ्ठल रूख्मीणी मंदिरात व नामदेव पायरी जवळ नारळ फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नारळाच्या सालीमुळे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नारळ बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. Body:पंढरपूर शहरात आषाढी वारी निमित्त पूढील पंधरा दिवस लाखो भाविक दर्शऩासाठी येणार आहेत. 17 जुलै 2019 पर्यंत आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांकडून नामदेव पायरी व परिसरात नारळ फोडण्याने चिखल होण्याची शक्यता आहे. नारळ फोडणे व नारळाच्या सालीमुळे भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास बंदी घातली आहे. हे आदेश 3 जुलै 2019 रोजी सायंकाळी 6 वाजलेपासून ते दिनांक 17 जुलै 2019 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील, असेही उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी ढोले यांनी आदेशात सांगितले आहे.Conclusion:नोट- सोबत जोडलेले फाईल फूटेज आहेत. मागील तीन ते चार दिवसात मंदिराचे फूटेज पाठविलेले आहेत. त्यातील काही फूटेज या बातमीसाठी वापरावेत ही विनंती किंवा या सोबत पाठविलेले फूटेज वापरावे....
आता सोबत जोडलेले हे फूटेज जूने आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.