ETV Bharat / state

पंढरपुरात कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

पंढरपूर तालुक्यातील गावांमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

pandharpur
पंढरपूर
author img

By

Published : May 24, 2021, 8:27 PM IST

पंढरपूर - सोलापूच्या पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. गावनिहाय कोरोना रुग्णांची यादी तयार करुन कोणताही रुग्ण घरी राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्यास विलगीकरणात दाखल केले जात आहे. जादा रुग्णसंख्या असलेल्या गावात जास्तीत जास्त कोरोना चाचण्यांवर भर दिला जात आहे. यातून रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

तालुका प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी

मार्च महिन्यापासून पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावांची यादी तयार करण्यात आली आहे. त्या गावातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये जे नागरिक बाधित आढळतील त्यांना तत्काळ संस्थात्मक विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येणार आहेत. काही रुग्ण घरातच थांबत असल्याने संपूर्ण कुटुंब बाधित होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही सचिन ढोले यांनी केले आहे.

कडक कारवाई

तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशसानाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या गावात पोलीस प्रशासनाच्या वतीने दिवस-रात्र गस्त सुरु करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जे नागरिक उपाचारांविना घरीच थांबले आहेत, त्यांची माहिती घेऊन त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरु

'तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. कोरोना रुग्ण विलगीकरणात राहील, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, यांची आरोग्य पथकामार्फत माहिती घेतली जात आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे', असे आवाहन तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.

हेही वाचा - सोलापूर : सांगोला तालुक्यात अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.