ETV Bharat / state

सोलापुरात काल 905 जणांना कोरोना, 28 मृत्यू - सोलापूर कोरोना अपडेट्स

सोलापूर शहरात काल 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर नवीन 57 जणांना बाधा झाली. दुसरीकडे, ग्रामीण भागात 23 जणांचा मृत्यू झाला. 848 नवीन रुग्ण आढळले आहेत.

solapur
सोलापूर
author img

By

Published : May 27, 2021, 4:43 AM IST

सोलापूर - जिल्ह्यात बुधवारी (26 मे) एकूण 1312 रुग्ण कोरोनामुक्त झाले. बुधवारी एकाच दिवशी शहर आणि जिल्ह्यात असे मिळून 905 नवे कोरोना रुग्ण आढळले. 28 रुग्णांचा मृत्यू झाला. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या 50 पेक्षा कमी झालेली असतानाच बुधवारी 57 रूग्ण आढळले आहेत. तर 5 रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आरोग्य खात्याने टेस्टींग कमी करूनही रूग्ण कमी झालेले नाहीत. बुधवारी जिल्हा आरोग्य प्रशासनाला 8 हजार 709 संशयितांमध्ये 848 नवे रूग्ण आढळले. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 23 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सोलापूर शहर अहवाल

सोलापूर शहरात महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने 2 हजार 58 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 57 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर शहरात 76 जणांनी कोरोना आजारावर मात केली आहे. शहरात बुधवारी 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात कोरोना आजाराची लाट हळूहळू ओसरत आहे. शहरातील रुग्णालयातही उपचार घेऊन घरी परतणाऱ्याची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी 615 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सोलापूर ग्रामीण अहवाल

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 8 हजार 709 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 848 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर कोरोना विषाणूवर उपचार सुरू असताना 23 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत 10 हजार 355 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पंढरपूर तालुक्यात दिलासा

ग्रामीण भागातील पंढरपूर तालुक्‍यास दिलासादायक बाब म्हणजे दोन दिवसात एकाही रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. बुधवारी पंढरपूर तालुक्‍यात 163, सांगोल्यात 57, करमाळ्यात 118, दक्षिण सोलापुरात 31 रूग्ण वाढले आहेत. तर अक्‍कलकोट तालुक्‍यात 45, बार्शीत 112, माढ्यात 102 रूग्ण वाढले असून त्या ठिकाणी प्रत्येकी 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच माळशिरस तालुक्‍यात 133 रूग्ण वाढले असून तेथील तिघांचा, तर मोहोळ तालुक्‍यात 42 व उत्तर सोलापूर तालुक्‍यात 16 रूग्ण वाढले आहेत. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मंगळवेढ्यात 31 रूग्ण वाढले आहेत, तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत 10 लाख 62 हजार 88 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एकूण 1 लाख 19 हजार 761 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 1 लाख 6 हजार 908 रूग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाखांवर; 1362 नवे रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.