नागपूर - प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरांसाठी नागपूरकरांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण यापूर्वी घरांसाठी केलेले अर्ज योग्य नसल्याचे सांगत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता नव्याने अर्ज करण्याची मागणी समोर ठेवली आहे. त्यानुसार अर्जदाराला १० हजार ५०० रुपये भरावे लागणार आहेत.
या योजनेअंतर्गत नागपुरात ४,३५० घरांचे काम सुरू आहे. या घरांसाठी यापूर्वी १७ हजार लोकांनी अर्ज केले होते. परंतु आता घराचा प्राधान्यक्रम, वर्गवारी आणि इच्छुक यांचा उल्लेख अर्जात नव्याने होणार आहे. त्यामुळे पुन्हा अर्ज भरण्याचे आवाहन नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही घरे लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती नागपूरच्या आयुक्त शीतल तेली यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.