ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचे नवे 1878 रुग्ण; 38 रुग्णांचा मृत्यू - corona patient deaths in Solapur

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज बुधवारी 7840 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामधून 1, 646 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Solapur corona update
सोलापूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 28, 2021, 10:10 PM IST

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर सुरुच आहे. सोलापुरात आज एकूण 1, 878 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 38 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. शहर आणि जिल्ह्यात 1, 306 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

वाढती रुग्णसंख्या आणि वाढते मृत्यू दर यामुळे सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तर प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत कोरोना विषाणू महाामारीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये आज बुधवारी 814 तर शहरात 492 असे 1306 रुग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा-रिकामे ऑक्सिजन सिलिंडर लावल्याने रुग्णाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

सोलापूर ग्रामीणात 814 रुग्णांची कोरोनावर मात
सोलापूरच्या ग्रामीण भागात आज बुधवारी 7840 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामधून 1, 646 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज बुधवारी 814 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर उपचार घेत असताना 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही 11,512 रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-गडचिरोलीत पोलीस-नक्षलवादी चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

सोलापूर शहरात 492 रुग्णांची कोरोनावर मात
सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने 2291जणांची टेस्ट केली. त्यामध्ये 232 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापुरात नव्याने दाखल होत असल्यापैकी बरे होण्याऱ्याची संख्या अधिक आहे. सोलापूर शहरात उपचार घेत असलेल्या 492 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, शहरात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुच आहे. पॉझिटिव्ह असलेल्या आणि उपचार घेत असलेल्या 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात आजही विविध रुग्णालयात 3,081 रुग्ण उपचार घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.