सोलापूर - राष्ट्रवादीचे माढ्यातील आमदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांचे बधू बबनराव शिंदे यांनी आज सहपत्नी निमगावमध्ये मतदान केले. यावेळी त्यांनी संजय शिंदे हे प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
या निवडणुकीच्या प्रचारात शेतीचे प्रश्न, ग्रामीण विकास, दलितांच्या समस्यांवर आधारीत मुद्दे विचारात घेणे गरजेचे होते. मात्र, तो वैयक्तिक पातळीवर केला गेला. त्यामुळे निवडणुकीत प्रचाराची पातळी खालावली असल्याचे, स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.