ETV Bharat / state

सोलापुरात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा

केंद्र सरकारने २०१५ पासून भारतात ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून मान्यता दिली आहे. तेव्हापासून सोलापुरात 'हातमाग दिन' साजरा करण्यात येत आहे. तर बुधवारी यानिमित्ताने सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते विणकर बागेतील विणकाम करणाऱ्या कारागिरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सोलापुरात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा
author img

By

Published : Aug 8, 2019, 10:01 AM IST

सोलापूर - शहरात बुधवारी राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील विणकर बागेमध्ये असलेल्या विणकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सोलापुरात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा

केंद्र सरकारने २०१५ पासून भारतात ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून मान्यता दिली आहे. तेव्हापासून सोलापुरात हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे. तर बुधवारी यानिमित्ताने सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते विणकर बागेतील विणकाम करणाऱ्या कारागीरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात केला.

हातमाग दिनाचा इतिहास

कलकत्ता शहरातील प्रसिद्ध असलेल्या टाऊन हॉलमध्ये ७ ऑगस्ट १९०५ रोजी महाराजा महिंद्र चंद्रनंदी यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम बंगालच्या विभाजनाला विरोध करण्यासाठी स्वदेशी जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंग्लडहून आयात करण्यात आलेल्या विदेशी वस्त्रांवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्त्रे वापरावे, हा निर्णय घेण्यात आला. यालाच अनुसरुन भारतातील विविध प्रातांत हातमाग सोसायटी स्थापन झाल्या. त्यावेळच्या राजकीय पक्षानेदेखील अनधिकृतपणे ७ ऑगस्ट हा दिन हातमाग दिवस म्हणून साजरा करत होते.

हातमाग दिन हा राष्ट्रीय पातळीवर साजरा व्हावा, यासाठी रापोलू आनंद भास्कर यांनी विविध राज्यात फिरून याची माहिती गोळा केली. यासाठी आंध्रप्रदेशातील हातमाग संघटनेच्या नेत्यांना एकत्रित करून त्यांनी हातमागविषयी राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रापोलू भास्कर हे राज्यसभेवर सदस्य म्हणून गेले. राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारने २०१५ मध्ये ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून अधिकृत घोषित केले.

सोलापुरात महत्व

१८ व्या शतकापासून आंध्रप्रदेशातून अनेक विणकर लोक सोलापुरात येऊन स्थायिक झाले आहेत. तर या विणकर समाजाच्यावतीने सोलापुरात मागील अनेक वर्षापासून हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे.

Intro:mh_sol_02_handloom_day_7201168
सोलापूरात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा

सोलापूर-
सोलापूरात राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विणकर बागेमध्ये असलेल्या विनकरांच्या पूतळ्याला पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोलापूर शहरात विणकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सोलापूरात हातमाग दिन साजरा करण्यात आला. Body:7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. 2015 पासून भारतात 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तेव्हा पासून सोलापूरात हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे. सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते विणकर बागेतील विणकाम करणाऱ्या कारागीरांच्या पूतळ्याला पूष्पहार अर्पण करण्यात केला.

हातमाग दिनाचा इतिहास

7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्ता शहरातील प्रसिद्ध असलेल्या टाऊन हॉलमध्ये महाराजा महिंद्र चंद्रनंदी यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम बंगालच्या विभाजनाला विरोध करण्यासाठी स्वदेशी जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंग्लडहून आयात करण्यात आलेल्या विदेशी वस्त्रांवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्त्रे वापरावे म्हणून निर्णय घेण्यात आला. यालाच अनुसरुन भारतातील विविध प्रातांत हातमाग सोसायटी स्थापन झाल्या. व त्यावेळच्या राजकीय पक्षाने देखील अनधिकृत पणे 7 ऑगस्ट हा दिन हातमाग दिवस म्हणून साजरा करत होते.
हातमाग दिन हा राष्ट्रीय पातळीवर साजरा व्हावा यासाठी रापोलू आनंद भास्कर यांनी विविध राज्यात फिरून याची माहिती गोळा केली. रापोलू भास्कर यांनी आंध्रप्रदेशातील हातमाग संघटनेच्या नेत्यांना एकत्रित करून हातमाग विषयी राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रापोलू भास्कर हे राज्यसभेवर सदस्य म्हणून गेले. राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर रापोलू भास्कर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारने 2015 मध्ये 7 ऑगस्ट ला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून अधिकृत घोषित केले.

सोलापूरात महत्व
सोलापूरात 18 व्या शतकापासून विणकर समाज हा सोलापूरात येऊन स्थायिक झालेला आहे. आंध्रप्रदेशातून सोलापूरात येऊन स्थायिक झालेल्या या विणकर समाजाच्या वतीने सोलापूरात मागील अनेक वर्षापासून हातमाग दिन साजरा करण्यात येतोय. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.