सोलापूर - भाजपच्या विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीला बोलावले जाते. (Nana Patole In Soalapur) त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात. मग, फोन टॅपिंग प्रकरणातील जबाबासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावले तर त्यामध्ये घाबरण्याचे काय काणर? तसेच, त्या गोष्टीचे राजकारण करण्याची काय गरज? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Nana Patole strongly criticizes BJP) ते सोलापूर दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते.
ओबीसींचा मेळावा
रश्मी शुक्ला त्याठिकाणी काम करीत असताना त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते. त्यांना कोणी परवानगी दिली, याची चौकशी होणार आहे. मुळात भाजपला लोकशाही, संविधान मान्य नसल्याने ते आपल्यावर काहीतरी आले की गोंधळ निर्माण करीत असल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे. पटोले हे सोलापुरातील ओबीसींचा मेळावा आणि सोलापूर शहर कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने रविवारी (दि. 13 मार्च)रोजी ते येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले होते.
पहाटेच्या शपथविधीनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता-
पटोले यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले, पहाटे शपथविधी होऊन नवे सरकार स्थापन झाले, पण ते सरकार पडल्यानंतर सर्वच पक्षांची आवस्था काय झाली होती. त्यावेळी आमच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवले असते तर निश्चितपणे कॉंग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. पण, सोनिया गांधी यांनी सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी जाहीर करावी लागली.
2024 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होईल-
प्रत्येक पक्षाने स्वबळाची भाषा केली असून आम्हीही त्यासाठी तयार आहोत. कॉंग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष असून शेतकरी, बेरोजगारी, गरिबी या मुद्द्यावर आम्ही जनतेत जात आहोत. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहोत. निश्चितपणे आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल ही 'काळ्या दगडावरील पांढरी रेघ' आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, (2024)च्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष राहील. एक कुटुंब एकत्रित आल्यानंतर भांड्याला भांडे लागणारच, तरीही आम्ही स्वबळावर लढण्यासही तयार असल्याचे पटोले यांनी सोलापुरात स्पष्ट केले.
हिंदु-मुसलमानात वाद लावून भाजपने निवडणूक जिंकली-
देशात बेरोजगारी व गरिबी वाढली आहे. शेतकरी व व्यापारी अडचणीत सापडला आहे. (2014)आणि(2019)मध्ये भाजपने दिलेल्या घोषणांना बगल देऊन पाच राज्यातील निवडणुकीत विशेषत: उत्तर प्रदेशात भाजपने हिंदु व मुसलमान यांच्यात भांडण निर्माण करून चार राज्यात यश मिळवल्याची टीका प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली. देशाच्या केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत पोहचलेले सुशिलकुमार शिंदे यांचे नेतृत्व त्यांनी जातीच्या राजकारणातूनच संपवल्याचाही यावेळी दावा केला.
हेही वाचा - Accident On Pandharpur Road : भाविकांच्या ट्रॅक्टरला अपघात; सातजण जागीच ठार, तर 40 गंभीर जखमी