सोलापूर - माढा शहरातील घरांवर महिलाच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. स्री शक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
घरावर विनाशुल्क पाट्या लावण्याचा उपक्रम राबवणारी माढा नगरपंचायत राज्यातली पहिली नगरपंचायत ठरली आहे. महिलांच्या सन्मानार्थ नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांच्या संकल्पनेतून नगरपंचायत आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. रविवारी सकाळी सन्मती नगर प्रभागातील महिलांच्या घरावर नावाच्या पाट्या (फलक) लावण्यात आल्या.
हेही वाचा - VIDEO : .. त्यामुळे मी कोणाशीही हस्तांदोलन करत नाही, अजित पवारांनी केला खुलासा
घराच्या मुख्य द्वारावर कुटुंबातील महिलांची नावे लागल्याने कुटुंबीय भारावून गेले असून उपक्रमाचे शहरवासियांमधून स्वागत होते आहे. कुटूंबाला महिलांच्या नावाची ओळख करुन देण्याचा उपक्रम निश्चितच राज्यभरातील गावा पुढे आशादायी आणि अनुकरणीय असाच आहे. नगराध्यक्षा साठे यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन प्रभागातील महिलांची नावे देण्याचे आवाहन केले होते. टप्या टप्यानुसार पाट्या लावल्या जाणार असून पहिल्या टप्यात १५०० घरावर महिलांच्या नावाचे फलक लावले जाणार आहेत. त्याचे काम महिला दिना पासून सुरू झाले आहे. सोबतच देशभक्तीची भावना शहरवासियांमध्ये रुजावी याकरिता साठे याच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून माढ्यात सामुदायिक राष्ट्रगिताचा उपक्रम नगरपंचायतच्या माध्यमातून सुरु आहे.
हेही वाचा - 'अलग ये मेरा रंग है', अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला तासाभरातच मिळाले मिलियन व्हिव्ज