ETV Bharat / state

सोलापुरात कोरोना टेस्ट वाढविल्या; रुग्णवाढीचा गुणाकार रेशो कमी झाला - जिल्हाधिकारी - सोलापूर कोरोना आकडेवारी बातमी

सोलापुरात टेस्ट वाढविल्याने रुग्ण निदान लवकर होत आहे. तसेच गुणाकार पद्धतीने वाढणाऱ्या कोरोना विषाणूंची तीव्रता देखील कमी झाली असून रुग्णवाढ ही 21.2 टक्के आहे. तर मृत्यूदर हा 5.5 टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

रुग्णवाढीचा गुणाकार रेशो कमी झाला
रुग्णवाढीचा गुणाकार रेशो कमी झाला
author img

By

Published : Jul 28, 2020, 9:40 PM IST

सोलापूर : सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी कोरोना महामारीवर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाबाबत महत्वपूर्ण माहिती सांगत कोरोना रुग्णसंख्या, त्यावर उपचार, खाटांची संख्या आदींविषयी माध्यमांना महिती दिली. सोलापुरात टेस्ट वाढविल्याने रुग्ण निदान लवकर होत आहे. तसेच गुणाकार पद्धतीने वाढणाऱ्या कोरोना विषाणूंची तीव्रता देखील कमी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

सद्यस्थितीत सोलापुरात रुग्णवाढ ही 21.2 टक्के आहे. तर मृत्यूदर हा 5.5 टक्के आहे. सुरुवातीला मृत्यूदर हा 10 टक्क्यांवर होता तो सद्या 5.5 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 58 टक्के आहे. 1 जुलैपासून आजतागायत 33 हजार 870 टेस्ट केल्या असून आणखीन टेस्ट वाढविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातील खाटांची संख्या पाहता जवळपास 10 हजारच्या पुढे रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी शहरातील कोरोना महामारीवर आढावा सांगितला. लॉकडाऊनच्या काळात शहरातदेखील टेस्ट वाढविल्या व रुग्णांवर वेळीच उपचारास सुरुवात केली, असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य आजारावर आजतागायत एकूण 21 कोटींचा खर्च आला आहे. हा खर्च आणखी वाढू शकतो, असे सांगण्यात आले. तर, शासनानेदेखील वेळोवेळी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.