ETV Bharat / state

सोलापूर: शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन

author img

By

Published : Feb 6, 2021, 7:24 PM IST

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच सोलापूर- अक्कलकोट राज्य मार्गावर विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन

सोलापूर- दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच सोलापूर- अक्कलकोट राज्य मार्गावर विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कृषी कायदे मागे घ्यावेत, राज्य सरकारने वीजबिल माफ करावे अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. चक्काजाम आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सोलापूर- विजापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 75 दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. हे कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र कायदे अजूनही रद्द न झाल्याने, आज याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर - विजापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन

अक्कलकोट - सोलापूर राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वळसंग गावाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात हे आंदोलन होत आहे. सरकारने हे कायदे तातडीने रद्द करावेत, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करू, भाजपच्या एकाही नेत्याला जिल्ह्यात फिरकू देणार नाही. असा इशारा प्रहारचे नेते मोहसीन तांबोळी यांनी दिला आहे.

रस्त्यावर उतरून लढा तीव्र करणार - विजय रणदिवे

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी विजय रणदिवे यांनी केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून लढा तीव्र करणार असल्याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.