ETV Bharat / state

निर्दयी..! बार्शी तालुक्यात आईनेच केला पोटच्या तान्ह्या मुलाचा खून

आश्विनीच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची माहिती तिच्या निकटवर्तीयांनाही झाली होती. मात्र, तिला वाचविण्यासाठी त्यांनी सार्थकच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीत सर्वांनी आमची काही तक्रार नसल्याचे म्हटले. घरातीलच व्यक्ती मुलाच्या मृत्यूबाबत तक्रार नसल्याचे म्हणत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे यांना या खून प्रकरणाबाबत गोपनीय बातमीदाराकडून अचूक माहिती मिळाली होती.

mother killed nine monthe old baby
आरोपी आश्विनी तुपे
author img

By

Published : Aug 26, 2020, 7:24 AM IST

Updated : Aug 26, 2020, 3:01 PM IST

सोलापूर- पोटच्या तान्ह्या मुलाची आईनेच गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना बार्शी तालुक्यातील वारंगवाडीत समोर आली आहे. दोन मुलातील अंतर खूप कमी आहे आणि तान्हा असलेला मुलगा खूपच किरकिर करतो म्हणून त्याचा खून केल्याची कबुली बाळासाठी वैरीण झालेल्या आईने दिली आहे. सार्थक स्वानंद तुपे, असे ९ महिन्याच्या मृत बालकाचे नाव आहे, तर आश्विनी तुपे असे आरोपी आईचे नाव आहे.

बार्शी तालुक्यातील वारंगवाडी येथील रहिवासी स्वानंद तुपे यांना दोन मुले आहेत. मात्र, या दोन्ही मुलांच्या जन्मामधील अंतर हे केवळ दीड वर्षाचे आहे. या दोघांना सांभाळायचा खूप त्रास होतो. तसेच दुसरा मुलगा सार्थक हा खूपच रडतो आणि किरकिर करतो म्हणून त्याची आई आश्विनी तुपे हिने २२ ऑगस्टला भर दिवसा मोबाईल चार्जरच्या वायरीने सार्थकचा गळा आवळून निर्दयीपणे खून केला. त्यानंतर तिने घरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी सार्थकचा खून केला, असा बनाव केला. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सार्थकचा खून आई आश्विनी हिनेच केल्याचे निष्पन्न झाले, तशी तिने कबुलीही दिली आहे.

बार्शी पोलीस उपअधीक्षक

आश्विनीच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची माहिती तिच्या निकटवर्तीयांनाही झाली होती. मात्र, तिला वाचविण्यासाठी त्यांनी सार्थकच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीत सर्वांनी आमची काही तक्रार नसल्याचे म्हटले. घरातीलच व्यक्ती मुलाच्या मृत्यूबाबत तक्रार नसल्याचे म्हणत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे यांना या खून प्रकरणाबाबत गोपनीय बातमीदाराकडून अचूक माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी एका साक्षीदाराकडे चौकशी केली असता, आश्विनीनेच गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, गुन्ह्याचा उद्देश किंवा कारण समोर येत नव्हते. अखेर पोलिसांनी आश्विनीला ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची व कारणांची कबुली दिली.

हा तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, सहाय्यक पोलीस फौजदार जाधव, हवालदार माने, मंगरुळे, भोसले, मंडलीक, डोंगरे , नाईक लोहार, धिमधिमे, पोलीस शिपाई घागरे, भराटे, फत्तेपुरे, सगरे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

Last Updated : Aug 26, 2020, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.