ETV Bharat / state

मुलाने आत्महत्या केलेल्या ठिकाणीच आईने केली आत्महत्या - गणपती घाट सोलापूर

शहराच्या मध्यभागी असलेल्या गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात एका महिलेच्या मृतदेह तरंगत असताना दिसून आला. काही सुज्ञ नागरिक येथून जात असताना त्यांचा नजरेस ही बाब आली. नेहमीप्रमाणे गणपती घाट येथे दर्शनासाठी आल्यानंतर त्यांना तलावात महिलेचा तरंगणारा मृतदेह त्यांना आढळला. या महिलेच्या मुलाने काही महिन्यापूर्वी याच तलावात आत्महत्या केली होती.

mother committed suicide in solapur , solapur suicide news,  siddheshwar talav,  ganpati ghat solapur,  सोलापूर आत्महत्या बातमी,  सिद्धेश्वर तलाव सोलापूर,  गणपती घाट सोलापूर,  महिलेची आत्महत्या सोलापूर
आत्महत्या
author img

By

Published : Apr 1, 2021, 7:23 PM IST

Updated : Apr 1, 2021, 7:48 PM IST

सोलापूर - सिद्धेश्वर तलाव येथील गणपती घाट येथे एका महिलेने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याच्या मुलाने डिसेंबर 2020 मध्ये याच ठिकाणी आत्महत्या केली होती. मुलाचा विरह सहन न झाल्याने आईने देखील त्याच ठिकाणी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणपती घाट येथे आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याने येथे सुरक्षितता म्हणून भिंत बांधून त्याला फाटक बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शारदा भीमराव कोळी (वय 40 वर्ष, रा. जम्मा वस्ती, सोलापूर)असे मृत महिलेचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्ते जहांगीर शेख व इतर मदतनिस यांनी शारदा यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

पाण्यात तरंगत होता मृतदेह -
शहराच्या मध्यभागी असलेल्या गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात एका महिलेच्या मृतदेह तरंगत असताना दिसून आला. काही सुज्ञ नागरिक येथून जात असताना त्यांचा नजरेस ही बाब आली. नेहमीप्रमाणे गणपती घाट येथे दर्शनासाठी आल्यानंतर त्यांना तलावात महिलेचा तरंगणारा मृतदेह त्यांना आढळला. येथील नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

डिसेंबर महिन्यात शारदा यांच्या मुलाने इथेच केली होती आत्महत्या -

फौजदार चावडी पोलीस ठाण्याला याबाबत माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दल जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत कक्षातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृत महिलेचे नाव शारदा भीमराव कोळी आहे. यापूर्वी ३१ डिसेंबरला मृत महिलेच्या मुलाने गणपती घाट येथे आत्महत्या केली होती. मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर मृत महिलेचे मानसिक संतुलन बिघडले होते. आता त्याच ठिकाणी तिने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे.

वारंवार गणपती घाट येथे आत्महत्या होत आहेत-

सिद्धेश्वर तलाव येथील गणपती घाट येथे वारंवार आत्महत्याच्या घटना होत आहेत. ही बाब विचारात घेऊन या तलावाला संरक्षक जाळी अथवा भिंती बनवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा शिक्षिकेचा आरोप

Last Updated : Apr 1, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.