ETV Bharat / state

सोलापूर कोरोना अपडेट : सोमवारी आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूची नोंद

सोलापूर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 21 हजार 264 झाली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या 5 हजार 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 761 तर ग्रामीण भागातील 4 हजार 275 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 193 अहवाल प्रलंबित आहेत.

solapur corona update
सोलापूर कोरोना अपडेट
author img

By

Published : Sep 7, 2020, 9:40 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातला आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी 500 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 513 तर महापालिका हद्दीतील 47 अशा एकूण 560 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच ग्रामीणमध्ये 16 तर महापालिका हद्दीतील दोन अशा एकूण 18 रुग्णांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापुरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू आणि बाधित रुग्णांची वाढ होण्याचा हा पहिलाच दिवस आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 21 हजार 264 झाली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या 5 हजार 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 761 तर ग्रामीण भागातील 4 हजार 275 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 193 अहवाल प्रलंबित आहेत. त्यामध्ये ग्रामीणमधील 137 तर महापालिका हद्दीतील 56 अहवालांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बाधितांची एकूण संख्या 14 हजार 185 तर महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 7 हजार 79 झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 21 हजार 264 झाली आहे.

सोमवारी नव्याने आढळलेल्या 513 बाधितांमध्ये माळशिरस तालुक्‍यातील 125 तर पंढरपूर तालुक्‍यातील 124 बाधितांचा समावेश आहे. बार्शी तालुक्‍यात कोरोनाने सर्वाधिक 106 जणांचा बळी घेतला आहे. बार्शी पाठोपाठ आता पंढरपूर तालुक्‍यातील मृतांची संख्या 65 एवढी झाली आहे. माढा तालुक्‍यातील मृतांची संख्याही वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या 840 झाली आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीतील मृतांची संख्या 429 तर ग्रामीण भागातील मृतांची संख्या 411 झाली आहे. महापालिका हद्दीतील मृतांच्या संख्येएवढीच संख्या आता ग्रामीण भागात होत आहे. सोलापुरातील 224 रुग्ण एकाच दिवशी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 19 तर ग्रामीण भागातील 205 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत सोलापुरात एकूण 15 हजार 388 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 5 हजार 889 तर ग्रामीण भागातील 9 हजार 499 जणांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.